चीनची प्रिमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus सध्या भारतीय बाजारात स्वस्त 5जी स्मार्टफोन आणत आहे. परंतू कंपनीने हे फोन आणताना क्लालिटीशी खेळ केल्याचे दिसत आहे. OnePlus Nord 2 5G हा कंपनीचा नॉर्ट सीरीजचा तिसरा फोन आहे. परंतू एका ग्राहकाने हा नवा कोरा फोन घेऊन पाच दिवस नाही झाले तोवर त्याचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. (OnePlus Nord 2 5G blast after 5 days use in Bengaluru.)
ही घटना बंगळुरूची असल्याचे सांगितले जात आहे. एक महिलेने तिच्या बॅगमध्ये OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन ठेवला होता. त्याचा स्फोट झाला आहे. या फोनचे फोटो काढून वनप्लसला टॅग करत तक्रार करण्यात आली आहे. अंकुर शर्मा नावाच्या युजरने ट्विट केले होते. ते आता डिलीट करण्यात आले आहे.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, महिलेने पाच दिवस आधीच OnePlus Nord 2 5G खरेदी केला होता. रविवारी हा फोन पर्समध्ये ठेवून सायकलने ती बाजारात जात होती. तेव्हा अचानक स्फोट झाला. फोनला अचानक आग लागली आणि धूर निघू लागला.
या ट्विटनंतर वनप्लसच्या सपोर्ट टीमने यावर उत्तर दिले आहे. याची आम्ही चौकशी करू असे म्हटले आहे. अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की वनप्लसने महिलेला नवीन फोन दिलाय की नाही. वनप्लसने म्हटले आहे की, असे प्रकार कंपनी गंभीरतेने घेते. याची चौकशी केली जात आहे. फोनमध्ये आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.
OnePlus Nord 2 गेल्या महिन्यातच लाँच झाला आहे. 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. 65 वॉट फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. OnePlus Nord 2 5G ची किंमत 27,999 रुपयांपासून सुरु होते.