नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसंबंधित बातम्या येत आहेत की कंपनी युजर्संच्या सुविधेसाठी नवीन फीचर्स घेऊन येत आहे. यातच आता समोर आलेल्या नवीन रिपोर्टनुसार, लवकरच युजर्संना ट्विटरवर शॉपिंगची सुविधा मिळणार असून यासाठी कंपनी ई-कॉमर्स सेवा सुरू करणार आहे. (social media twitter is testing shopping feature for android users here are the detail)
ट्विटरने आपल्या नवीन फीचरची टेस्टिंग सुरू केली आहे. हे फीचर आधी अँड्राईड फोनवर टेस्टिंग केले जात आहे, ज्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, हे फीचर आधी अँड्राईड युजर्संना उपलब्ध होईल. Tech Crunch च्या रिपोर्टनुसार, ट्विटरचे शॉपिंग फीचर सर्वप्रथम कतारमध्ये दिसले आणि याची माहिती ब्रिटनच्या सोशल मीडिया कन्सल्टंट Matt Navarra ने दिली होती.
ट्विटरच्या शॉपिंग फीचरची टेस्टिंग कतारमध्ये सुरू करण्यात आली असून काही अँड्रॉईड यूजर्सच्या ट्विटर अॅपमध्ये शॉपिंग कार्ड्स आणि शॉपिंग लिंकचा पर्याय असल्याचेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. शॉपिंग कार्ड ट्विटर फीडमध्येही दिसून येत आहे. याशिवाय एक मोठे निळा रंगाचे शॉप बटण देखील असणार आहे.
तसेच, ट्विटरच्या शॉपिंग कार्डमध्ये एखाद्या उत्पादनाच्या किंमतीविषयीही माहिती देण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. मात्र, अद्याप शॉपिंग फिचरबाबत कंपनीकडून अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. यासाठी युजर्सना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ट्विटर आपल्या युजर्संना चांगल्या सुविधा देत आहे.
कंपनी त्याच श्रेणीतील नवीन पर्यायांचा विस्तारही करीत आहे. यामध्ये मॅप्स आणि सुपर फॉलोज इंटीग्रेटेड फेसबुक सारख्या बिझनेस प्रोफाइलचा समावेश आहे. ज्यामुळे युजर्सला त्यांच्या फॉलोअर्ससाठी एक्सक्लुसिव्ह कंटेंट देण्याची सुविधा देत आहे.