नवी दिल्ली : भारतातील अल्पवयीन मुलांना सिम कार्ड दिले जाऊ नये, असे दूरसंचार विभागाने (DoT) म्हटले आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, आता 18 वर्षांखालील कोणतीही व्यक्ती देशातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरकडून सिम कार्ड खरेदी करू शकत नाही. दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, अल्पवयीन मुलाला सिम कार्ड विकणे ही दूरसंचार ऑपरेटरची बेकायदेशीर कृती असेल. सरकारच्या या निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घ्या.. (sim cards should not be issued to minors said department of telecommunications)
CAF फॉर्म भरल्यानंतरच सिम कार्डनवीन सिम खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ग्राहक अधिग्रहण फॉर्म (CAF) भरावा लागतो. हा सहसा दूरसंचार कंपनी आणि ग्राहक यांच्यात करार असतो. या फॉर्ममध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सिम कार्ड खरेदीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. या व्यतिरिक्त, जर एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसेल, तर त्याला सिम कार्डही विकता येणार नाही.
एका व्यक्तीच्या नाव्यावर किती सिम कार्ड?हा एक अतिशय सामान्य प्रश्न आहे, जो प्रत्येक वेळी विचारला जातो परंतु त्याचे अचूक उत्तर नाही. साधारणपणे असे म्हटले जाते की, एखादी व्यक्ती त्याच्या नावावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड खरेदी करू शकते, तर असे नाही. एखादी व्यक्ती त्याच्या नावावर जास्तीत जास्त 18 सिमकार्ड खरेदी करू शकते. यापैकी 9 मोबाईल कॉलसाठी आणि इतर 9 मशीन-टू-मशीन (M2M) कम्युनिकेशसाठी वापरले जातील.
फक्त एक रुपयात सिम कार्डअलीकडेच, सरकारने सिमकार्ड घेण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, त्यानुसार तुम्हाला सिमकार्ड मिळवण्यासाठी फिजिकलऐवजी डिजिटल केवायसी असेल. या प्रकरणात ग्राहकांना कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. याशिवाय पोस्टपेड सिमचे प्रीपेडमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणत्याही कागदाची गरज भासणार नाही. नेटवर्क प्रदाता कंपनी अॅपद्वारे वापरकर्ते स्वतः केवायसी करू शकतील आणि यासाठी ग्राहकांकडून फक्त 1 रुपये आकारले जातील.