Twitter News: इलॉन मस्क (Elon Musk) यांनी Twitter चे CEOपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून अनेकांनी या पदासाठी रस दाखवला आहे. अनेकांनी ट्विटरवर CEO होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातच आता भारतीय-अमेरिकन व्यावसायिक आणि 'ईमेल'चा शोध लावण्याचा दावा करणारे शिवा अय्यादुराई (Shiva Ayyadurai) यांनी ट्विटरचे सीईओ होण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे.
ट्विटरवर शिवा अय्यादुराई(Shiva Ayyadurai) यांनी एक ट्विट करत इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरचा CEO होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले, “डिअर इलॉन मस्क, माझी @Twitterचा CEO होण्याची इच्छा आहे. मी MIT मधून 4 डिग्री घेतल्या असून, आतापर्यंत 7 यशस्वी हाय-टेक सॉफ्टवेअर कंपन्या तयार केल्या आहेत. कृपया अर्ज करण्याची प्रक्रिया सुचवा."
कोण आहेत शिवा अय्यादुराई?शिवा अय्यादुराई भारतीय-अमेरिकन इंजिनिअर, राजकारणी आणि व्यावसायिक आहेत.अय्यादुराई यांचा जन्म मुंबईतील तामिळ कुटुंबात झाला आणि ते वयाच्या सातव्या वर्षी अमेरिकेत गेले. ते स्वतःला ईमेलचा शोधकर्ता म्हणतात. 1978 मध्ये अय्यादुराई यांनी एक संगणक प्रोग्राम तयार केला, ज्याला त्यांनी "ईमेल" म्हटले.
या प्रोग्रामने इंटरऑफिस मेल सिस्टमच्या सर्व फंक्शन्सची प्रतिकृती तयार केली - इनबॉक्स, आउटबॉक्स, फोल्डर्स, मेमो, संलग्नक, अॅड्रेस बुक, इतर. नंतर, 30 ऑगस्ट 1982 रोजी यूएस सरकारने अधिकृतपणे अय्यादुराई यांना ईमेलचा शोधकर्ता म्हणून मान्यता दिली आणि त्यांच्या 1978 च्या शोधासाठी त्यांना ईमेलचा पहिला यूएस कॉपीराइट प्रदान केला.