सध्याच युग हे डिजिटल युग आहे, मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काहीजण रात्रभर इन्स्टाग्रामचे रील्स पाहण्यात वेळ वाया घालवतात, पण यामुळे अनेकांच्या झोपेवर परिणाम झाला आहे. इंस्टाग्रामचे व्यसन असे आहे की यामुळे लोकांना रात्रीची झोप येत नाही. बरेचदा लोक २-३ वाजेपर्यंत फोनकडे बघत बसतात. एकमेकांसोबत रील्स शेअर करणे किंवा रिल्स पाहणे ही नवीन सामान्य गोष्ट झाली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक का केली? मोठं कारण आलं समोर, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
बरेच वापरकर्ते रात्री फोन बाजूला ठेवतात आणि झोपायला जातात. पण फोन व्हायब्रेट होताच ते फोन उचलतात आणि पुन्हा वापरायला लागतात. ही समस्या खूप सामान्य आहे आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला Android फोनच्या काही सेटिंग्ज सांगत आहोत ज्या तुम्ही लगेच कराव्यात.
आपण रात्री मोबाईल वापरत असताना असणारी ब्लू लाईट हानिकारक आहे, हा प्रकाश झोप न येण्याचे महत्वाचे कारण आहे. हा प्रकाश मेलाटोनिन ला ब्लॉक करते. यामुळे आपल्याला झोप येते. या समस्येला संपवण्यासाठी एन्ड्रॉइड ७ मध्ये Night Light फिचर दिले आहे. यात ब्लू लाईट कमी केली जाते. जेव्हा हा प्रकाश कमी होतो तेव्हा फोनचा वापर केल्यानंतरही झेप येण्याची शक्यता आहे.
हे फीचर चालू करण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. नंतर डिस्प्ले आणि ब्राइटनेस वर टॅप करा. नंतर नाईट लाइट वर जा आणि रीडिंग मोड चालू करा. येथे तुम्हाला Set screen colors वर जाऊन Warmer वर टॅप करावे लागेल.
जर तुम्ही युट्युब जास्त वापरात असाल तर तु्म्हाला रिमाइंडर लावाला लागेल. यामुळे तुम्ही किती उशीर युट्युब वापरले याची माहिती मिळेल. यासाठी सेटिंगमध्ये जा आणि त्यानंतर जनरल वर टॅप करा. यानंतर, Remind me when it's bedtime हे टॉगल चालू करा. येथून तुम्ही तुमची झोपण्याची वेळ सेट करू शकता.
डिजिटल वेलबीइंग हे स्क्रीन वेळ कमी करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले साधन आहे. यामध्ये बेडटाइम मोड देण्यात आला आहे. हे वैशिष्ट्य कॉल आणि सूचनांसाठी आपोआप डू नॉट डिस्टर्ब चालू करते. तसेच स्क्रीन काळा आणि पांढरा करते. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर डिजिटल वेलबीइंग आणि पॅरेंटल कंट्रोलवर जाऊन बेडटाइम मोड सुरू करावा लागेल.