चार्जिंग स्पीड हे एक असं फिचर आहे ज्यात अजूनही कंपन्यांची शर्यत सुरु आहे. शाओमी आणि ओप्पो या टेक्नॉलॉजीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. असे स्मार्टफोन्स बाजारात आल्यानंतर टेक युट्युबर्स त्यांची टेस्टिंग करतात आणि कंपन्यांच्या दाव्याची सत्यता तपासतात. OnePlus 9 Pro फक्त 45 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होतो, असा दावा वनप्लसनं केला आहे. त्याची टेस्टिंग एका अनोखा प्रयोग करून लोकप्रिय यूट्यूबर TechRax नं केली आहे. फक्त सामान्य तापमानावर नव्हे तर फ्रिजिंग टेम्परेचरवर देखील ही टेस्टिंग करण्यात आली आहे.
अशी झाली टेस्टिंगची सुरुवात
यूट्यूबरनं सर्वप्रथम सामान्य तापमानावर फोन चार्ज केला. या तापमानावर फोननं चार्ज होण्यासाठी 42.3 मिनिटं घेतली. 0 ते 100 टक्के चार्जिंगसाठी लागणाऱ्या वेळेच्या बाबतीतला कंपनीचा दावा खरा ठरला. परंतु टेस्टिंग यावर थांबली नाही.
फ्रिजमध्ये फोन चार्ज होतो?
युट्युबरनं वनप्लस स्मार्टफोन 3 डिग्री सेल्सियस (39 डिग्री फॅरनहाईट) तापमानावर फ्रिज ठेवून फोन चार्ज करण्यास सुरुवात केली. थक्क करणारी बाब म्हणजे यावेळी फोन फक्त 41 मिनिटांत फुल चार्ज झाला. त्यांनतर तापमान 2.7 डिग्री सेल्सियस अर्थात 37 डिग्री Fahrenheit ठेवण्यात आलं. वनप्लस स्मार्टफोननं फुल चार्ज होण्यासाठी एक मिनिट कमी घेत 40 मिनिटांत 100 टक्के चार्ज झाला.
पाहा Video:
त्यानंतर TechRax नं OnePlus 9 Pro ला लिक्विड नायट्रोजनमध्ये 20 सेकंद ठेवलं. विशेष म्हणजे इतक्या कमी तापमानात देखील फोन ऑन होता. परंतु लिक्विडमधून बजेट काढल्यावर त्यावर बर्फ जमा झालं आणि स्क्रीन बंद पडली. तरीही फोन चार्ज होत होता. हा प्रयोग घरी न करण्याचा सल्ला युट्युबरनं दिला आहे.
हे देखील वाचा: