नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. फोनवर मेसेज आला अथवा कॉल आला तर रिंगटोनच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. मात्र अनेकदा कामाच्या वेळात फोनचा आवाज येऊ नये यासाठी फोन हा व्हायब्रेट अथवा सायलेंट मोडवर ठेवला जातो. मात्र अनेकदा फोनच्या रिंगचा आवाज येत नाही. त्यामुळे कॉल मिस होतात. महत्त्वाच्या कामादरम्यान फोन रिसीव्ह न केल्यास नुकसान होण्याची शक्यता ही अधिक असते.
फोन सायलेंट मोडवर असेल तर या गोष्टी साहजिक आहेत. मात्र अनेकदा अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये फोनची रिंग वाजणं आपोआप काही कारणास्तव बंद होतं. स्मार्टफोनच्या रिंगचा आवाज न येण्यामागे किंवा ते बंद होण्यामागे अनेक कारणं आहे. मात्र असं झाल्यास काय करायचं हे जाणून घेऊया.
व्हॉल्यूम सेटिंग्स चेक करा
अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनवर चार स्लाईड मिळतात. मीडिया व्हॉल्यूम, कॉल व्हॉल्यूम, रिंग व्हॉल्यूम आणि अलार्म व्हॉल्यूम हे चार पर्याय मिळतात. त्यामुळे या व्हॉल्यूमच्या मदतीने आवाज कमी जास्त करून बघा आणि त्याचे सेटिंग्स हवे तसे बदला.
एअरप्लेन मोड चेक करा
स्मार्टफोनमध्ये एअरप्लेन मोड ऑन आहे का नाही हे एकदा चेक करा. ऑन असेल तर युजर्सन कोणताही कॉल येणार नाही. Settings>Network & Internet>Airplane Mode मध्ये जाऊन चेक करू शकता.
डू नॉट डिस्टर्ब डिसेबल
डू नॉट डिस्टर्ब फोनमध्ये इनेबल आहे की नाही ते पाहा. ऑन असेल तर इनकमिंग कॉल्ससोबतच कोणतेही नोटिफिकेशन्स येणार नाहीत. अनेकदा ते सेटिंगमध्ये आपोआप ऑन होते. त्यामुळे Settings>Sounds>Do not Disturb जाऊन एकदा नक्की चेक करा.
मॅलवेअर स्कॅन करा
स्मार्टफोनमधील मॅलवेअर इन्फेक्शनमुळे अनेकदा फोनची रिंग वाजत नाही. मॅलवेअर बाइट्स अॅप्सच्या मदतीने अशा अॅपची माहिती मिळते. ते अॅपनंतर फोनमधून काढून टाका.
डिव्हाईस रिस्टार्ट करा
डिव्हाईस रीबूट करा. अनेकदा फोनमध्ये काही समस्या निर्माण झाली की प्रामुख्याने डिव्हाईस रिस्टार्ट केलं जातं.
सर्व्हिस सेंटरमध्ये जा
फोनच्या रिंगची वाजणं बंद झालं अथवा अन्य काही फोनशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास तो सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा. फोनच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यास फोन रिपेअर अथवा रिप्लेस केला जाईल.
फोन खूप स्लो चार्ज होतो? 'ही' आहेत कारणं
फोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच बॅटरी लवकर लो होते. फोन चार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. मात्र कधी कधी फोन स्लो चार्ज होतो. त्यामागे अनेक कारण असतात. ही कारणं जाणून घेऊया.
- चार्जर खराब असल्यामुळे फोन अनेकदा चार्ज होत नाही. अशा वेळी फोनसोबत येणारी केबल आणि अॅडप्टरच्या मदतीने फोन चार्ज करण्याचा सल्ला दिला जातो. ओरिजनल चार्जरची खरेदी करा.
- स्लो चार्जिंगसाठी नेहमी चार्जर जबाबदार असतो असं नाही. अनेकदा पॉवर सोर्स वीक असल्याने फोन स्लो चार्ज होतो.
- फोनची बॅटरी खराब झाल्यामुळे काही वेळा फोन स्लो चार्ज होतो.
- यूएसबी पोर्ट डॅमेज झालं असल्यास फोन स्लो चार्ज होतो. अशावेळी ते बदला.
- फोन स्लो चार्ज होण्यासाठी काही वेळा बॅकग्राऊंड अॅप देखील जबाबदार असतात. फोनमध्ये एखादं नवीन अॅप डाऊनलोड केल्यानंतर फोन स्लो झाला असेल तर ते अॅप लगेच अनइन्स्टॉल करा.