आज एप्रिल फुल असल्यामुळे तुम्ही तुमच्या मित्र-मत्रिणींना फसवण्याचे नवे-नवे मार्ग शोधत असाल. यातील अनेक प्रॅन्क जुने झाले असतील किंवा सहज पकडता येतील असे असतील. परंतु आज आम्ही जो प्रॅन्क घेऊन आलो आहोत तो तुमच्या फ्रेंड्सच्या अत्यंत जिवलग वस्तूला निरुपयोगी बनवेल. तुम्ही त्यांच्या स्मार्टफोनला सुपर स्लो बनवू शकता. त्यांना स्मार्टफोनमध्ये व्हायरस आल्यासारखं वाटेल.
आज ज्या प्रॅन्कची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. तसेच या ट्रिकमुळे स्मार्टफोनला देखील कोणतेही नुकसान होत नाही. फक्त स्मार्टफोन नेहमीच्या गोष्टी खूप स्लो करतो, त्यामुळे फोन हँग होत असल्याचा भास होतो किंवा युजर फोनमध्ये व्हायरस आल्याचं देखील म्हणू शकतात. तुम्ही पुन्हा सेटिंग्समध्ये बदल करून त्यांचा स्मार्टफोन ठीक देखील करू शकता.
असा करा स्मार्टफोन स्लो:
- सर्वप्रथम तुमच्या टार्गेटचा अँड्रॉइड स्मार्टफोन कोणत्यातरी बहाण्याने अनलॉक अवस्थेत मिळवा.
- स्मार्टफोन मिळताच सेटिंग्समध्ये जा.
- सेटिंगमध्ये ‘Build Number’ सर्च करा.
- बिल्ड नंबरवर 10 वेळा टॅप करा.
- आता स्मार्टफोनचा डेव्हलपर मोड अॅक्टिव्हेट होईल.
- पुन्हा सेटिंगमध्ये जाऊन ‘Devloper Options’ शोधा.
- या ऑप्शन्समध्ये खाली स्क्रोल करून Animation चे ऑप्शन दिसतील.
- हे ऑप्शन्स 1X च्या ऐवजी 10X करा म्हणजे तो फोन दहापट स्लो होईल.
- पुन्हा 1X केल्यावर स्मार्टफोन पुर्वव्रत होईल किंवा अॅनिमेशन बंद केल्यास स्मार्टफोन सुपरफास्ट होईल.
टीप: एप्रिल फुलचा प्रॅन्क जास्त ताणून मित्र किंवा मैत्रीण मात्र गमावू नका.