Smartphones Camera: पूर्वी 'रोटी, कपडा और मकान' या मानवाच्या तीन मुलभूत गरजा होत्या. पण, गेल्या काही वर्षांपासून स्मार्टफोनदेखील मानवाची गरज बनला आहे. दूरवर बसलेल्या प्रियजनांशी बोलण्यासोबतच, बरीचशी दैनंदिन कामेही या मोबाईलच्या मदतीने काही मिनिटांत पूर्ण होतात. बहुतांश स्मार्टफोन्सची बेसिक डिझाईन सारखीच असते. प्रत्येक मोबाईलला समोर एक कॅमेरा, पाठीमागे दोन किंवा तीन कॅमेरे असतात. तुम्ही कधी विचार केलाय का, हे कॅमेरे मोबाईलच्या डाव्या बाजूलाच का असतात, उजव्या बाजूला का नसतात? त्यामागे एक खास कारण आहे...
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. इंटरनेटच्या या युगात स्मार्टफोनशिवाय जीवन जगणे कठीण झाले आहे. आता आपण जाणून घेऊया की, स्मार्टफोनमधील कॅमेरा डाव्या बाजूला का असतो. तुम्हाला आठवत असेल, सुरुवातीला बहुतांश लोकांकडे छोटे फीचर फोन असायचे, नंतर हळूहळू स्मार्टफोन बाजारात आले. या फोन्समध्ये कॅमेरा मध्यभागी होता. पण नंतर हळूहळू सर्व कंपन्यांनी कॅमेरा मोबाईलच्या डाव्या बाजूला वळवला.
आयफोनपासून सुरुवातदिग्गज स्मार्टफोन कंपनी अॅपले सर्वप्रथम आपल्या आयफोनमध्ये डाव्या बाजूला कॅमेरा देण्यास सुरुवात केली होती. यानंतर, हळूहळू बहुतांश कंपन्यांनी हाच पॅटर्न स्वीकारला आणि कॅमेरा फोनच्या डाव्या बाजूला शिफ्ट केला. कॅमेरा डाव्या बाजूला ठेवणे, हे डिझाईन नसून त्यामागे खूप रंजक कारण आहे.
डाव्या बाजूच्या कॅमेराचे कारणजगातील बहुतांश लोक डाव्या हाताने मोबाईल वापरतात. अशा स्थितीत मोबाईलच्या मागे डाव्या बाजूला बसवलेल्या कॅमेराने फोटो काढणे किंवा व्हिडीओ काढणे सोपे जाते. याशिवाय मोबाईल फिरवून लँडस्केप मोडमध्ये फोटो काढताना मोबाईलचा कॅमेरा वरच्या बाजूला राहतो, त्यामुळे लँडस्केप मोडमध्येही फोटो सहज काढता येतो. या कारणांमुळे मोबाईलमधील कॅमेरा डाव्या बाजूला ठेवला जातो.