नवी दिल्ली - भारतासह संपूर्ण जगातच कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. जगातील सर्वच देश आपल्या नागरिकांना या काळात साबन अथवा सॅनिटायझरने हात धुन्याचा सल्ला देत आहेत. लोक सॅनिटायझरचा वापर अगदी मोबाईल फोन सॅनिटाईझ करण्यासाठीही करत आहेत.
अनेक लोक आपला फोन सॅनिटाईझ करण्यासाठी अँटी बॅक्टेरिअल वेट-वाइप्सदेखील वापरत आहेत. तर काही लोक असेही आहेत, जे फोन स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनेटायझरचा वापर करत आहेत.
या लोकांना सॅनिटायझरमुळे फोनचे काय नुकसान होते, हेच माहित नाही. खरे तर सॅनिटायझर वापरल्याने फोनच्या स्क्रीनसोबतच हेडफोन जॅक आणि स्पीकरदेखील खराब होत आहेत.
काही मोबाईल दुरुस्त करणारे लोक सांगतात, की सध्या त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी येत असलेले अधिकांश मोबाईल सॅनिटायझरमुळेच खराब झालेले आहेत. त्यांनी सांगितले, की मोबाईलला सॅनिटायझर लावताना लोकांकडून अनेकता मोबाईलच्या हेडफोन जॅकमध्ये सॅनिटाईझर जाते. यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन फोन खराब होत आहेत. एवढेच नाही, तर अनेक लोकांच्या फोनचे डिस्प्ले आणि कॅमऱ्याच्या लेन्सदेखील सॅनिटायझरमुळे खराब झाल्या आहेत.
ही आहे मोबाईल स्वच्छ करण्याची योग्य पद्धत -
मेडिकल वाइप्सचा करा वापर -मोबाईल स्वच्छ करण्यासाठी आपल्याला बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही 70 टक्के अल्कोहोल असलेल्या मेडिकल वाइप्सचा वापर करता येईल. याच्या सहाय्याने आपला फोन चांगल्या प्रकारे स्वच्छ होईल.
कापसाचा वापर करा - सर्वप्रथम तुमचा फोन स्विच ऑफ करा. यानंतर कापसाचा एक तुकडा रबिंग अल्कोहलमध्ये बुडवा आणि नंतर आपल्या फोनची स्क्रिन सरळ धरून साफ करा. खरे तर, आपण आपल्या मोबाईल कस्टमर केअरवरूनच मोबाईल स्वच्छ करण्याचा सल्ला घेणे योग्य आहे. कारण सर्वच कंपन्यांचे फोन मटेरिअल वेगवेगळे असते.
अॅन्टी बॅक्टेरिअल पेपर-अनेक मेडिकल्सवर आपल्याला सहजपणे अँटी बॅक्टेरिअल टिश्यू पेपर्स मिळतील. यानेही आपण आपला फोन स्वच्छ करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार
रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा
गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात
"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा