काही दिवसांपूर्वी Vivo नं एक नवीन ‘टी’ सीरिज बाजारात सादर केली होती. या सीरिजमधील एक 5G स्मार्टफोन भारतात देखील लाँच झाला आहे. तर आता मलेशियामध्ये कंपनीनं नवीन Vivo T1x 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्यात 50MP कॅमेरा, Snapdragon 680 चिपसेट आणि 5000mAh असे शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया Vivo T1x 4G ची सविस्तर माहिती.
Vivo T1x 4G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo T1x 4G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टीयरड्रॉप नॉच असलेला पॅनल 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. विवोचा हा फोन Android 12 OS वर बेस्ड FunTouchOS 12 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी या ड्युअल सिम फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.0, GPS, USB-C पोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे.
Vivo T1x 4G स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. तर मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 680 प्रोसेसर आहे. सोबत 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. यात रॅम वाढवण्यासाठी एक्सटेंडेड रॅम फिचर देखील आहे. फेस अनलॉक आणि साईड फिंगरप्रिंट स्कॅनरसह Vivo T1x 4G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते.
Vivo T1x 4G ची किंमत
मलेशियात Vivo T1x 4G स्मार्टफोनचे दोन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. 4GB रॅम व 64GB स्टोरेज असल्या मॉडेलची किंमत 699 MYR (सुमारे 12,300 रुपये) आहे. तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंट 899 MYR (सुमारे 15,800 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फोन लवकरच भारतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.