शाओमीनं आपला हुकमी एक्का गेल्या आठवड्यात भारतात सादर केला होता. आयफोनच्या तोडीचे फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 Pro भारतीयांच्या भेटीला आला आहे. 2 मे अर्थात आजपासून हा दणकट स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे पहिल्याच सेलमध्ये 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर्स, 12GB RAM, 2K+ डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंग असलेल्या Xiaomi 12 Pro वर मोठी सूट मिळत आहे.
मई) या फोनची पहली विक्री होने जा रही आहे. इसे ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉन व्यतिरिक्त Mi.com से दुपारी 12 वाजता विकत घेता येईल. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट, तीन 50 MP चा कॅमेरा, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि सुपर फास्ट चार्जिंग जैसे फीचर्स देण्यात आले आहेत.
Xiaomi 12 Pro ची किंमत आणि ऑफर्स
हा फोन Noir Black, Opera Mauve आणि Couture Blue कलरमध्ये कंपनीच्या वेबसाईटसह ईकॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून विकत घेता येईल. Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोनचे दोन रॅम व्हेरिएंट 256GB स्टोरेजसह भारतात आले आहेत. 62999 रुपयांमध्ये 8GB RAM व्हेरिएंट विकत घेता येईल तर 12GB RAM व्हेरिएंटची किंमत 66,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ICICI बँकेच्या कार्डवर 6,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल तसेच लाँच ऑफर अंतर्गत शाओमी 4000 रुपये ऑफ देईल.
Xiaomi 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी 12 प्रो स्मार्टफोनमध्ये 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा 2के डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा ई5 अॅमोलेड एलटीपीओ 2.0 पॅनल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला विक्टसच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. हा फोन 10बिट कलर आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी शाओमी 12 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स707 7पी लेन्स मुख्य सेन्सरचे काम करते. सोबत 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सलचाची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
पावर बॅकअपसाठी Xiaomi 12 Pro मध्ये 4,600एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. यातील 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला हा फोन मिनिटांत फुल चार्ज करेल. हा फोन फक्त 18 मिनिटांत 0 ते 100 टक्के पर्यंत चार्ज होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हा डिवाइस 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
Xiaomi 12 Pro लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित नव्या कोऱ्या मीयुआय 13 वर चालतो. 3 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसरसह 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट या शाओमी 12 प्रो चा सर्वात मोठा आकर्षण बिंदू आहे. हा फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.