शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

23 हजारांत फ्लॅगशिप फोन; 64MP कॅमेऱ्यासह iQOO Neo 6 SE 5G लाँच, असे आहेत दमदार फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Published: May 07, 2022 12:13 PM

iQOO Neo 6 SE स्मार्टफोन 12GB RAM, अँड्रॉइड 12, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  

iQOO सध्या अनेक दमदार स्मार्टफोन सादर करत आहे. विवोचा सब-ब्रँड असून देखील कंपनी विवोला टक्कर देत आहे. आता चीनमध्ये iQOO Neo 6 SE स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे Neo 6 लाईनअपमधील हा स्वस्त डिवाइस आहे. लेटेस्ट iQOO Neo 6 SE स्मार्टफोनमध्ये 12GB RAM, अँड्रॉइड 12, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेरा देण्यात आला आहे.  

iQOO Neo 6 SEचे स्पेसिफिकेशन्स 

iQOO Neo 6 SE स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. iQOO Neo 6 SE स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा OIS ला सपोर्टसह मिळतो. सोबत 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. यात 16MP चा सेल्फी शूटर देण्यात आला आहे. 

iQOO Neo 6 SE स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो जुन्या जेनरेशनचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. सोबत 12GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. सह सादर केला गेला आहे. आयकूचा हा अँड्रॉइड 12 स्मार्टफोन OriginOS Ocean वर चालतो. यातील लिक्विड कूलिंग सिस्टम हेवी परफॉर्मन्सनंतर देखील फोन थंड ठेवते. 

iQOO Neo 6 SE स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी मिळते जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात X-अ‍ॅक्सिस लीनियर व्हायब्रेशन मोटर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.2, NFC, 5G, 4G LTE आणि Wi-Fi मिळतो.  

iQOO Neo 6 SEची किंमत 

iQOO Neo 6 SE स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट चीनमध्ये आले आहेत. 8GB/128GB मॉडेल 1,999 युआन (सुमारे 23,100 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर 8GB/256GB आणि 12GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 2,299 युआन (सुमारे 26,550 रुपये) आणि 2,499 युआन (सुमारे 28,850 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा डिवाइस ऑरेंज, इंटरस्टेलर आणि निऑन कलरमध्ये विकत घेता येईल. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल