ऑनलाईन शॉपिंग म्हटलं कि जोपर्यंत प्रोडक्टचा बॉक्स हातात येत नाही तोपर्यंत विश्वास बसत नाही. तर कधी कधी बॉक्स हातात येतो पण त्यात काही तरी भलतंच सामान पॅक केलेलं असतं. अशीच एक घटना Flipkart च्या Big Billion Days Sale मध्ये घडली आहे. या सेलमध्ये एका ग्राहकाने Apple iPhone 12 ऑर्डर केला होता परंतु त्याच्या बदल्यात त्याला साबणाच्या वड्या बॉक्समध्ये पॅक करून पाठवण्यात आल्या.
iPhone 12 च्या ऐवजी साबणाच्या वड्या
सिमरनपाल सिंह नावाच्या व्यक्तीने फ्लिपकार्टवरील ‘बिग बिलियन डेज सेल’ मधून आपल्यासाठी एक नवीन Apple iPhone 12 ऑर्डर केला होता. ही प्रीपेड म्हणजे ऑनलाईन पेमेंट केलेली ऑर्डर 3 ऑक्टोबरला देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी फ्लिपकार्टने बॉक्स पाठवला. परंतु जेव्हा बॉक्स उघडण्यात आला तेव्हा त्यात आयफोन 12 च्या ऐवजी साबणाच्या दोन वड्या बाहेर पडल्या.
फ्लिपकार्टने घेतली दखल
सिमरनपाल सिंह यांनी अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी ओपनबॉक्स डिलिव्हरीचा पर्याय निवडला होता. या डिलिव्हरी अंतर्गत डिलिव्हरी बॉय ग्राहकाच्या समोर बॉक्स उघडून दाखवतो. सिंह यांनी डिलिव्हरी बॉयकडून बॉक्स उघडून घेतला आणि त्याचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. त्यामुळे डिलिव्हरी बॉयने देखील पहिले कि त्या बॉक्समध्ये iPhone 12 नसून साबण आहे.
या प्रकारची माहिती सिमरनपाल यांनी फ्लिपकार्टला कॉल करून सांगितली. अनेक वेळा कॉल केल्यानंतर ग्राहकाची मागणी मान्य करत फ्लिपकार्टने टी ऑर्डर रद्द केली. त्यांनतर काही दिवसांनी सिंह यांना त्यांचे पैसे परत मिळाले.