शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘व्यसन हे एकदाच सुटतं, लागण्यापूर्वी !’...नशा ये रील्स का नशा है !

By मनोज गडनीस | Updated: May 29, 2023 14:03 IST

विख्यात नाटककार राम गणेश गडकरी लिखित ‘एकच प्याला’ या नाटकात एक मर्मभेदी वाक्य आहे. ते लिहितात की, ‘व्यसन हे एकदाच सुटतं, लागण्यापूर्वी !’, नाटकातील हे वाक्य विलक्षण आहे.

मनोज गडनीसविख्यात नाटककार राम गणेश गडकरी लिखित ‘एकच प्याला’ या नाटकात एक मर्मभेदी वाक्य आहे. ते लिहितात की, ‘व्यसन हे एकदाच सुटतं, लागण्यापूर्वी !’, नाटकातील हे वाक्य विलक्षण आहे. किंबहुना तंत्रज्ञानाने व्यापलेल्या आजच्या आयुष्यात ‘सवयी’ आणि ‘व्यसन’ यातील सीमारेषा आता जेव्हा धूसर व्हायला लागली आहे, तेव्हा तर अशा वाक्याचा सखोल विचार करायला हवा. कारण आपल्याला काही गोष्टींची सवय आहे की, आपल्याला व्यसन लागलंय, हे तपासण्याची गरज आहे. तात्त्विक वाटाव्यात अशा या चार ओळी लिहिण्यामागचे कारण म्हणजे, आपल्या मेंदूला लागलेला इन्स्टाग्राम रील्सचा चाळा. चाळा हा शब्द कदाचित खुजा वाटेल इतके आपण आता या रील्सच्या आहारी गेलो आहोत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  

दुष्परिणाम काय होतात ?बहुतांश लोक दिवसभराचे काम आटपले की विरंगुळा म्हणून मनोरंजनाची विविध साधने हाताळतात. यामध्ये अलीकडच्या काळात विशेषतः झोपण्यापूर्वी लोक इन्स्टाग्रामचे रील्स पाहण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पण, यामुळे समस्या अशी निर्माण होते की, त्यात किती वेळ जातो हे कळत नाही. दुसरे म्हणजे मोबाइलच्या स्क्रीनलाइटमुळे मेंदूला विशिष्ट प्रकारचे सिग्नल मिळतात आणि मेंदू अधिकाधिक जागृत होत जातो. याचा परिणाम झोप पुरेशी होत नाही. झोपेचा दर्जा देखील खालावतो. अन् याचा थेट परिणाम हा शरीरावर होतो.मुळात एवढ्या कमी सेकंदांचे व्हिडीओ किंवा पोस्ट पाहिल्यामुळे एक पोस्ट पाहून समाधान होत नाही किंवा तो फॉर्मेट आवडल्यामुळे लोक पुढे पुढे स्क्रोल करत राहतात. याचा प्रमुख दुष्परिणाम असा की, माणसाची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता किंवा एकाग्रता कालावधी कमी होतो. इंग्रजीमध्ये याला अटेन्शन स्पॅन असे म्हणतात. ही क्षमता कमी झाली की, याचा थेट परिणाम आपल्या अन्य कामांवर होतो. 

रील्सची नशा कुणाकुणाला असते ?मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, इन्स्टाग्रामच्या रील्सची नशा ही केवळ पाहणाऱ्या प्रेक्षकालाच असते असे नव्हे. तर जो रील्स बनवतो त्याला देखील याची नशा असतेच. इंटरनेटच्या जगात ज्या काही नव्या गोष्टी किंवा ट्रेन्ड घडत असतात, त्यामध्ये आपणदेखील सहभागी व्हायला हवे, ही भावना बळावत जाते. सातत्याने आपल्याला पाहिले गेले पाहिजे, कौतुक व्हायला हवे, आपण चर्चेत असायला हवे, अशी भावना मनात घट्ट होत जाते. मग याची सवय नव्हे, तर व्यसनच लागते. 

सवय कशी सुटणार ?नियंत्रण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, ज्या प्रमाणात तुमच्यावर माहिती येऊन आदळत असते, अशा वेळी तुम्हालाच तुमचा निर्णय घ्यायला हवा. सवय लागण्याऐवजी जर आपणच एक निश्चित वेळ ठरवून त्यानुसार केवळ इन्स्टाग्रामच नव्हे, तर सोशल मीडिया हाताळला तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकते. सवयीच्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकणार नाही. मात्र, नियंत्रण हाच कळीचा मुद्दा आहे.

रील्स का पाहिली जातात ?मुळात मनोरंजनाच्या अन्य माध्यमाच्या तुलनेत इन्स्टाग्रामच्या रील्सचे वैशिष्ट्य म्हणजे याचा कालावधी किमान २० सेकंद ते कमाल ४० सेकंद इतकाच आहे. एवढ्या कमी वेळात कधी गाणी, विनोद, फूड रेसिपी, हॉटेलच्या जाहिराती अशी वैविध्यपूर्ण माहिती प्रसारित करण्याचे महत्त्वाचे प्रमुख साधन आहे. एवढ्या कमी वेळात असा वैविध्यपूर्ण कंटेट मिळत असल्याने लोक देखील याकडे झपाट्याने आकर्षित होत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया