Sony चे टीव्ही भारतात खूप लोकप्रिय आहेत. गुणवत्तेमुळे Bravia सीरिजचा प्रचंड मागणी आहे. किंमत जास्त असल्यामुळे कंपनीचे टीव्ही सर्वांनाच परवडत नाहीत. अशा लोकांसाठी कंपनीनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये Bravia 32W830K Google TV चा समावेश केला आहे. 32 इंचाचा हा स्मार्ट टीव्ही कंपनीचा सर्वात छोटा मॉडेल आहे, जो एचडी रेडी रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे.
Sony Bravia 32W830K Google TV चे स्पेसिफिकेशन्स
Sony Bravia 321830K मध्ये 32 इंचाचा HD रेडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही विविध एचडीआर मोडला सपोर्ट करतो. ज्यात एचडीआर 10 आणि हायब्रीड लॉग-गामाचा समावेश आहे. यात 20W आउटपुट देणारे दमदार स्पिकर्स देण्यात आले आहेत. जे डॉल्बी ऑडियो आणि क्लियर फेज फीचरला सपोर्ट करतात.
या स्मार्ट टीव्हीवर अनेक ओटीटी अॅप्सचा वापर करता येतो. BRAVIA 32W830K Apple होम किट आणि AirPlay ला सपोर्ट करत असल्यामुळे Apple डिवाइसवरील कंटेंट देखील स्ट्रीम करता येतो. टीव्हीमध्ये इन-बिल्ट हॅन्ड्स-फ्री वॉयस असिस्टंट मिळतो, त्यामुळे रिमोटची गरज जास्त पडत नाही. सोनी टीव्ही एक्स-प्रोटेक्शन प्रो टेक्नॉलॉजीसह येते जी धूळ आणि ओलाव्यापासून रक्षण करते. तसेच वीज पडल्यावर आणि विजेच्या झटक्यापासून वाचवणारी टेक्नॉलजी देखील मिळते.
Sony Bravia 32W830K Google TV ची किंमत
Sony Bravia 32W830K Google TV ची किंमत भारतात 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा टीव्ही विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला भारतातील कोणत्याही एका Sony सेंटर, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल.