सोनी एमएचसी-व्ही ११ हे मॉडेल ग्राहकांना १९,९९० तर सोनी शेक-एक्स ३डी हे मॉडेल ५०,९९० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. हे दोन्ही मॉडेल्स सोनी कंपनीच्या शॉपीजसह आघाडीच्या स्टोअर्समधून उपलब्ध करण्यात आले आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये कराओके आणि डिजे इफेक्ट प्रदान करण्यात आले आहेत. या अतिशय दर्जेदार मायक्रोफोन दिलेले आहेत. याच्या मदतीने कुणीही आपल्याला हवे ते गाणे म्हणून सोशल मीडियात शेअर करू शकतो. यात व्होकल फेडर फंक्शन देण्यात आले आहे. याच्या मदतीने सीडी सुरू असताना गायकाचा आवाज कमी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे कुणीही त्या संगीतासोबत गाण्याला स्वत:च्या आवाजाचा साज चढवू शकतो. तर सोनी शेक-एक्स 3डी या मॉडेलमध्ये चार साऊंड इफेक्ट देण्यात आले आहेत. यात फ्लँगर, वाह, आयसोलेटर आणि पॅन आदींचा समावेश आहे. यात सीडी/डीव्हीडीसह युएसबी आदींचा सपोर्ट आहे. तर ब्ल्यू-टुथ आणि वाय-फायच्या मदतीने स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅबलेट आदींसह कोणत्याही स्मार्ट उपकरणांमधील संगीत या ध्वनी प्रणालींवर ऐकणे शक्य आहे. तर सोनी कंपनीच्या म्युझिक सेंटर अॅपवरून कुणीही प्ले-लिस्ट मॅनेज करू शकतो. या दोन्ही मॉडेलच्या स्पीकरवर अतिशय आकर्षक असे एलईडी लाईट प्रदान करण्यात आले असून ते संगीताच्या तालावर चालू-बंद होत असल्यामुळे चित्ताकर्षक इफेक्ट प्रदान करतात.
सोनी एमएचसी-व्ही ११ हे मॉडेल अतिशय आटोपशीर आकाराचे आहे. यात एक स्पीकर प्रदान करण्यात आला आहे. याला सहजपणे हलविण्यासाठी हँडल देण्यात आले आहे. तर सोनी शेक-एक्स ३डी या मॉडेलमध्ये एका प्लगच्या माध्यमातून थेट गिटारचे इनपुट देण्याची सुविधा आहे.