नवी दिल्ली: गेल्या काही काळापासून कमी किंमतीत उत्तमोत्तम फिचर्स देणारे स्मार्टफोन्स लॉंच केले जात आहेत. मात्र, आयफोन असा ब्रँड आहे, जो किंमत आणि फिचर्स यांमध्ये तडजोड करत नसल्याचे पाहायला मिळते. आता सोनी कंपनीने फोटोग्राफर्ससाठी खास Sony Xperia Pro लॉंच केला आहे. या स्मार्टफोनमधील फिचर्स दमदार असून, किंमत २ लाखांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. (sony launced new smartphone for photographers sony xperia pro see price and specifications)
सोनी कंपनीने कंटेंट क्रिएटर्स, व्लॉगर्स, शॉर्ट मुव्हिज मेकर्स आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्स यांच्यासाठी खास Sony Xperia Pro लॉंच केला आहे. सोनीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन असून, यामध्ये HDMI पोर्ट देण्यात आला आहे. तसेच 4K ओएलईडी डिस्प्लेसह अन्य अनेक जबरदस्त फिचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे. हा पहिलाच स्मार्टफोन असेल, ज्यात HDMI पोर्ट देण्यात आले आहे.
Aadhar Card सुरक्षित कसे करावे? ‘या’ सोप्या पद्धतीने करा घरबसल्या लॉक
चक्रावून टाकणारी किंमत
Sony Xperia Pro युरोपीय देशात लॉंच करण्यात आला असून, युकेमध्ये याची किंमत २२९९ पाउंड म्हणजेच भारतीय चलनानुसार २ लाख ३५ हजार ४८६ रुपये आहे. तर अन्य युरोपीय देशांमध्ये २४९९ युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार, २ लाख २२ हजार ४०३ रुपये आहे. भारतात हा स्मार्टफोन केव्हा लॉंच होईल, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. युरोपमध्ये सोनी कंपनीचे मोठे मार्केट असल्यामुळे येथे हा स्मार्टफोन पहिल्यांदा लॉंच करण्यात आला असून, Sony online स्टोअर्सवर हा फोन खरेदी करता येऊ शकेल.
Sony Xperia Pro ची वैशिष्ट्ये
Sony Xperia Pro हा स्मार्टफोला ६.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याला गोरिला ग्लास ६ चे संरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये Snapdragon 865 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबीची स्टोअरेज कपॅसिटी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ४००० mAh बॅटरीसह उपलब्ध असून, २१W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 4K व्हिडिओचा पर्याय देण्यात आला असून, एका मॉनिटरप्रमाणेही या स्मार्टफोनचा वापर करता येऊ शकेल.
ट्रिपल कॅमेरा सेटअप
Sony Xperia Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी सेंसर १२ मेगापिक्सल असून, १२-१२ मेगापिक्सलचे अल्ट्रावाइड आणि डेप्थ सेंसरसह आणखी दोन कॅमेरा देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.