सोनीने जपानमध्ये आपल्या फ्लॅगशिप Xperia 10 III स्मार्टफोनचा लाईट व्हर्जन सादर केला आहे. Sony Xperia 10 III Lite स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 690 प्रोसेसरसह सादर केला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह जापान मध्ये JPY 46,800 (अंदाजे 31,600 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे हा फोन 27 ऑगस्टपासून विकत घेता येईल.
Sony Xperia 10 III Lite चे स्पेसिफिकेशन्स
Sony Xperia 10 III Lite मध्ये कंपनीने 6 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080x2520 आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 690 चिपसेट मिळतो, हा 5G चिपसेट आहे. हा फोन 6GB RAM आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता. हा फोन Android 11ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा एक फोन ड्युअल सिम आहे. यात कनेक्टिविटीसाठी Wi-Fi 802.11 ac, Bluetooth v5.1, USB Type-C port, 5G असे अनेक फीचर्स मिळतात. Sony Xperia 10 III Lite च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 12MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा वाईड अँगल सेन्सर आणि 8MP चा टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या सोनी फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.