सोनी एक्सपेरिया एक्सए१ अल्ट्रा हे मॉडेल २९,९९० रूपयात लाँच करण्यात आले होते. १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असून यात ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनचे फिचर देण्यात आले आहे. तर यातील मुख्य कॅमेरा २३ मेगापिक्सल्सचा असून यामध्ये एफ २.० अपार्चर, फेज डिटेक्शन, ऑटो-फोकस आदी विशेष फिचर्स असतील. या मॉडेलमध्ये सहा इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १०८० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी२० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची चार जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. इंटेलेजियंट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी २७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.
तर सोनी एक्सपेरिया एक्सए१ हे मॉडेल १९,९९० रूपयात लाँच करण्यात आले होते. याचेही मूल्य आता दोन हजारांनी घटविण्यात आले आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम तीन जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सोय असेल. यातील यातील मुख्य कॅमेरादेखील २३ मेगापिक्सल्सचा असून यामध्ये एफ २.० अपार्चर, फेज डिटेक्शन, ऑटो-फोकस आदी विशेष फिचर्स असतील. तर यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तसेच यातील बॅटरी २३०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.