Soundcore ने दोन ब्लूटूथ हेडफोन भारतात लॉन्च केले आहेत. हे हेडफोन्स Soundcore Life Q30 आणि Life Q35 या नावानं फ्लिपकार्टवर उपलब्ध झाले आहेत. 60 तासांचा बॅटरी बॅकअप ही या हेडफोन्सची खासियत आहे. तसेच साऊंडकोरचे हे हेडफोन हायब्रीड अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC), फास्ट चार्जिंगआणि NFC कनेक्टिविटीला सपोर्ट करतात.
Soundcore Life Q30 आणि Soundcore Life Q35 ची किंमत
Soundcore Life Q30 हेडफोन्सची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे, जो ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल. तर Soundcore Life Q35 साठी 9,999 रुपये मोजावे लागतील. हा मॉडेल पिंक कलर व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल. या ब्लूटूथ अॅक्सेसरीजसोबत एक ट्रॅव्हल केस देण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे.
Soundcore Life Q30 आणि Soundcore Life Q35 चे स्पेसिफिकेशन्स
Soundcore Life Q30 आणि Soundcore Life Q35 ची डिजाईन पाहता, यात मेमोरी फोम ईयर कप आणि हेडबँडसह लाईटवेट फ्रेमचा वापर करण्यात आला आहे.या हेडफोन्समध्ये कंपनीने 40mm स्लिक डायफ्राम ड्रायव्हरचा वापर केला आहे, त्यामुळे बेस आणि ट्रेबल सुधारतो. हे हेडफोन्स हायब्रीड अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन म्हणजे ANC ला सपोर्ट करतो, ज्यात ट्रांसपोर्ट, इंडोर आणि आउटडोर असे दिन मोड देण्यात आले आहेत. यातील ट्रान्स्परन्सी मोड कॉल किंवा मीटिंगमध्ये संवाद साधने सोप्पे करतो.
हे दोन्ही हेडफोन Hi-Res Audio आणि Hi-Res Audio Wireless सर्टिफाइड आहेत. साऊंडकोर लाईफ क्यू 35 मध्ये LDAC कोडॅक सपोर्ट मिळतो. दोन्ही डिवाइस ANC चा वापर केल्यास 40 तासांचा तर ANC विना 60 तासांचा प्लेबॅक टाईम देतात. हे हेडफोन फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतात आणि त्यामुळे पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये चार तासांचा प्लेबॅक मिळतो.