Soundcore नं भारतात आपले नवीन TWS Earbuds सादर केले आहेत. कंपनीनं नॉइज कॅन्सलेशन आणि गेमिंग मोडसह Soundcore Life Note 3 इयरबड्स लाँच केले आहेत. या इयरबड्समध्ये सिंगल चार्जवर 35 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हे इयरबड्स 18 महिन्यांच्या वॉरंटीसह 7999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.
Soundcore Life Note 3 चे स्पेसिफिकेशन्स
Soundcore Life Note 3 कार्बन फायबर पॅटर्न फिनिश असलेल्या ग्लॉसी केससह बाजारात आले आहेत. यात एर्गोनॉमिक डिजाइन देण्यात आली आहे. कंपनीनं यात थांपिंग आवाज देण्यासाठी 11mm कंपोजिट ड्रायव्हरचा वापर केला आहे. 10 मीटरची ब्लूटूथ रेंज असलेले हे इयरबड्स सिंगल चार्जवर 35 तासांपर्यंत प्ले बॅक टाइम देतात.
यातील मल्टी-मोड नॉइज कॅन्सलेशन फिचर आजूबाजूचा आवाज कमी करतो. जो ट्रांसपोर्ट, आउटडोर आणि इंडोर मोडसह सादर करण्यात आला आहे. यात फुल, वोकल आणि एन्हांस्ड वोकल मोड असे तीन ट्रान्सपरंट मोड देखील देण्यात आले आहेत. हे मोड आजूबाजूच्या परिसराचं भान राहावं म्हणून डिजाईन करण्यात आले आहेत.
यात चांगल्या नॉइज कॅन्सलेशनसाठी 6 मायक्रोफोनचा समावेश करण्यात आला आहे, जे कॉलिंगच्या वेळी देखील साऊंड इम्प्रूव्ह करतात. यात गेमिंग मोड देखील मिळतो जो साउंडकोर अॅपच्या माध्यमातून अॅक्टिव्हेट करता येतो. हरवलेले ईयरबड शोधण्यासाठी साउंडकोर अॅपवर “फाइंड माय हेडसेट” च फिचर देण्यात आलं आहे. ज्यामुळे या इयरबड्समधून मोठा आवाज येतो आणि लोकेशन समजण्यास मदत होते.
हे देखील वाचा: