नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. पण तुम्हाला माहिती आहे का? गुगल तुमच्या वाढदिवशी देखील तुम्हाला खास डुडल तयार करून शुभेच्छा देतं. मात्र यासाठी जीमेलवर लॉगइन करणं महत्त्वाचं आहे.
तुम्हालाही तुमच्या वाढदिवशी विशेष डुडल तयार करून गुगलकडून शुभेच्छा हव्या असतील तर सर्वप्रथम गुगलच्या सर्च इंजिनवर तुमच्या जीमेल अकाउंटवरून लॉगइन करणं अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्यानंतर जीमेल आयडीवर तुम्ही बरोबर वाढदिवसाबाबतचे तसेच विचारण्यात आलेले इतर डिटेल्स द्या. डिटेल्स दिले असतील तरच गुगल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे. गुगल एक खास डुडल तयार करून तुम्हाला या शुभेच्छा देईल.
गुगल खास डुडल तयार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतं हे काही नवीन नाही कारण 2010 पासून गुगलने युजर्सना अशाप्रकारे डुडल तयार करून शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता काळानुसार तंत्रज्ञानाच्या मदतीने यामध्ये नवनवीन बदल आणि खास गोष्टी देण्यात आल्या आहेत. फुगे, केकच्या माध्यमातून तर कधी कधी युजर्सना आवडणाऱ्या गोष्टींच्या मदतीने आकर्षक आणि हटके डुडल तयार करून गुगलकडून युजर्सना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात.