ओप्पोची Reno 6 सीरिज खूप लोकप्रिय ठरली. काही दिवसांपूर्वी आकर्षक Oppo Reno 6 Diwali Edtion देखील बाजारात उतरवला होता. आता कंपनी आगामी Reno 7 series च्या तयारीला लागली आहे. लीकनुसार ही सीरिज पुढील महिन्यात चीनमध्ये दाखल होईल. त्यानंतर हे फोन्स जगभरात उपलब्ध होतील. आता या सीरिजमधील Reno 7 SE, Reno 7 आणि Reno 7 Pro स्मार्टफोनचे संभाव्य स्पेक्स समोर आले आहेत. चला जाणून घेऊया ओप्पो कोणता धमाका करणार आहे.
OPPO Reno 7 SE चे लीक स्पेसिफिकेशन्स
OPPO Reno 7 SE या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 6.43-इंचचाचा फुलएचडी+ रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट असलेला E3 AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिवाइस मीडियाटेकच्या Dimensity 920 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. कंपनी यात 12GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 256 GB पर्यंतची UFS 2.2 स्टोरेज देऊ शकते. OPPO Reno 7 SE मधील 4300mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा (Sony IMX615) सेल्फी कॅमेरा मिळेल. तर रियर पॅनलवर 64-मेगापिक्सलचा (OmniVision OV64B) प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा (Sony IMX355) सेन्सर आणि 2-मेगापिक्सलची पोर्टेट लेन्स मिळेल.
OPPO Reno 7 चे लीक स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 7 स्मार्टफोन 6.5-इंचाच्या 90Hz रिफ्रेश रेट असलेल्या OLED FHD+ डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकच्या Dimensity 1200 चिपसेटची पॉवर मिळेल. त्याला 12GB पर्यंतच्या LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतच्या UFS 3.1 स्टोरेजची जोड देण्यात येईल.पॉवर बॅकअपसाठी Reno 7 स्मार्टफोन 4500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून मिळेल. तर रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सलचा OIS असलेला Sony IMX766 सेन्सर, 16-मेगापिक्सलचा Sony IMX481 अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सल पोर्टेड कॅमेरा मिळेल.
OPPO Reno 7 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा कर्व एज असलेला OLED डिस्प्ले देण्यात येईल जो FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ओप्पो रेनो 7 प्रो मध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 888 चिपसेट, 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज मिळेल. या डिवाइसमधील 4500mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर दोन फोन्स प्रमाणे यात देखील 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करेल. तर रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सलचा ओआयएस असलेला Samsung GN5 सेन्सर, 64-मेगापिक्सलचा OmniVision OV64B अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 13-मेगापिक्सचा Samsung S5K3M5 टेलीफोटो कॅमेरा देण्यात येईल.