Starlink Internet In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्टारलिंक, स्पेसएक्स यांसारख्या कंपनीचे प्रमुख एलोन मस्क (Elon Musk) भारतातील टेलीकॉम सेक्टर (Telecom Sector) मध्ये लवकर एन्ट्री घेणार आहेत. यासाठी त्यांची कंपनी Starlink ने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस लॉन्च (Satellite Internet Service) करण्यासाठी परवानगी मागणार आहे.
एलोन मस्क यांच्या कंपनीला परवानगी मिळाली, तर भारताच्या टेलीकॉम सेक्टर (Telecom Sector of India) मध्ये मोठा बदल होऊ शकतो. इकोनॉमिक टाइम्समधील रिपोर्टनुसार, स्टारलिंक (Starlink) भारतीय बाजारात अॅक्सेस आणि लँडिंग राइट्ससाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनी भारताचे डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशंस (DoT) शी संपर्कात आहे. अद्याप कंपनी किंवा डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन्सकडून यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाही.
जिओ आणि स्टारलिंकमध्ये थेट स्पर्धाया रिपोर्टनुसार, एलोन मस्कची कंपनी Global Mobile Personal Communications By Satellite (GMPCS) च्या परवान्यासाठी लवकरच अप्लाय करणार आहे. तर, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ची रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती ग्रुपची मालकी असलेल्या OneWeb कंपन्यांनी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसेज (Internet Services in India) साठी आधीच अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता स्टारलिंकला भारतात परवानगी मिळाल्यावर, त्याची थेट स्पर्धा रिलायन्स जिओसोबत असेल.
या देशात स्टारलिंकची सेवा सुरूएलोन मस्क (Elon Musk Starlink) जगभरातील अनेक देशात स्टारलिंकच्या सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर्षी मस्क यांच्या कंपनीने जापान (Japan)मध्ये आपली इंटरनेट सुरू केली आहे. साशिवाय, 2023 मध्ये साउथ कोरिया (South Korea)मध्येही कंपनीची सॅटेलाइट सेवा सुरू होऊ शकते.