शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
4
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
5
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
6
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
7
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
8
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
9
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
10
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
11
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
12
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
13
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
14
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
15
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
16
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
17
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
18
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
19
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
20
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती

भारतापूर्वी आपल्या शेजारील देशात सुरू झाली Starlink सॅटेलाईट इंटरनेट सेवा; किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 21:22 IST

इलॉन मस्कची कंपनी लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करू शकते.

Starlink : उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंक कंपनीचे सॅटेलाईट इंटरनेट भारतात कधी येणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या काही काळापासून या इंटरनेट सेवेची जगभरात चर्चा सुरू आहे. दरम्या, ही सेवा लवकरच भारतात सुरू होऊ शकते. पण, भारतापूर्वी आपला शेजारील देश भूतानमध्ये ही सॅटेलाईट आधारित इंटरनेट सेवा सुरू झाली आहे.

इलॉन मस्कची कंपनी लवकरच भारतातही सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करू शकते. दूरसंचार नियामकाद्वारे स्पेक्ट्रम वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, कंपनी भारतातही आपली सेवा सुरू करेल. स्टारलिंकने आपल्या अधिकृत X हँडलद्वारे याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतापूर्वी भूतानमध्ये स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. या ठिकामी ही सेवा सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे, तेथे डोंगराळ जास्त भाग आहे. अशा परिस्थितीत सॅटेलाईट आधारित इंटरनेट सेवा पुरवणे अधिक सोपे आणि कमी खर्चाचे ठरणार आहे.

किंमत किती आहे?स्टारलिंकच्या वेबसाइटनुसार, भूतानच्या माहिती विभागाने सॅटेलाइट इंटरनेट सेवेची किंमत निश्चित केली आहे. येथे रेसिडेन्शिअल लाइट प्लॅनची ​​किंमत Nu 3,000 पासून सुरू होते, म्हणजे अंदाजे 3,100 रुपये प्रति महिना, ज्यामध्ये वापरकर्त्यांना 23 bps ते 100 bps च्या वेगाने इंटरनेट मिळते. तर, स्टँडर्ड रेसिडेन्शिअल प्लॅनसाठी दरमहा Nu 4,200 रुपये, म्हणजेच अंदाजे 4,300 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये यूजर्सना 25 bps ते 110 bps च्या स्पीडने इंटरनेट सेवा मिळेल. इलॉन मस्कच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवेची किंमत तिथल्या स्थानिक टेलिकॉम ऑपरेटर्सपेक्षा खूप जास्त आहे.

सॅटेलाइट इंटरनेट सेवा कशी मिळवायची?स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा कंपनीच्या SpaceX द्वारे उपलब्ध आहे. त्यासाठी ग्राउंड टर्मिनल्स बसवले जातात, ज्याद्वारे घरोघरी इंटरनेट पोहोचवले जाते. स्टारलिंक त्यांचे इंटरनेट लोकांच्या घरी पोहोचवण्यासाठी ग्राउंड टर्मिनल किंवा रिसीव्हर्स स्थापित करते. सॅटेलाइटमधून इंटरनेट बीम या टर्मिनलवर येतो आणि त्याला जोडलेल्या वायर्सद्वारे घराघरांत पोहोचवला जातो. याचा अर्थ भूतानच्या लोकांना स्टारलिंक ग्राउंड रिसीव्हर बसवून डोंगराळ भागातही सुपरफास्ट इंटरनेट सेवा मिळू शकेल.

भारतात कधी लॉन्च होणार?येत्या काही महिन्यांत स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतातही सुरू होऊ शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच यासाठी स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया सुरू करू शकते. स्पेक्ट्रम वाटप पूर्ण झाल्यानंतर, स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्याची परवानगी मिळेल.

टॅग्स :Bhutanभूतानelon muskएलन रीव्ह मस्कtechnologyतंत्रज्ञान