SwaRail SuperApp : नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने एक नवीन सुपर अॅप लाँच केले आहे. या अॅपचे नाव SwaRail असे आहे. या अॅपवर प्रवाशांना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेता येणार आहेत. भारतीय रेल्वेचे हे नवीन सुपर अॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्सने (CRIS) विकसित केले आहे. सध्या हे अॅप प्ले स्टोअरवर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
अनेक सेवांचा लाभ मिळेलरेल्वेच्या या सुपर अॅपमध्ये सुद्धा सध्या विविध अॅप्सद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा मिळतील. या SwaRail अॅपच्या मदतीने प्रवासी आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकतील. तसेच, प्लॅटफॉर्म तिकिटे, पार्सल बुकिंग आणि पीएनआर बद्दल माहिती देखील मिळू शकेल. दरम्यान, या अॅपनंतर सध्या असलेले आयआरसीटीसी अॅप बंद होईल की ते सुद्धा चालू राहील, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ट्रॅव्हल असिस्टंट फीचर असेलरेल्वेच्या SwaRail या नवीन सुपर अॅप अंतर्गत, युजर्सना ट्रॅव्हल असिस्टंट फीचर देखील मिळेल. ज्यामध्ये सिंगल साइन-ऑन, ऑनबोर्डिंग आणि इतर अनेक सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळतील. तसेच, याठिकाणी युजर्सना वेगवेगळ्या अॅप्ससाठी वेगवेगळे लॉगिन आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. साध्या साइन इनच्या मदतीने, प्रवासी सहजपणे लॉग इन करू शकतील. नवीन युजर्सना सुरुवातीला काही महत्त्वाची माहिती अपडेट करावी लागेल.
सध्या कुठे डाऊनलोड करू शकता?जर तुम्हीही रेल्वेचे हे सुपर अॅप डाउनलोड करण्याचा विचार करत असाल, तर ते सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, अँड्रॉइड आणि अॅप स्टोअरवरील बीटा टेस्टिंगचे स्लॉट फुल झाले आहेत. तसेच, हे अॅप स्टेबल व्हर्जनमध्ये कधी लाँच केले जाईल, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
काय आहे सुपर अॅप SwaRail?भारतीय रेल्वेचे सुपर अॅप SwaRail हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. येथे युजर्सना एकाच अॅपवर सर्व सेवा मिळतील. सध्या रेल्वे सेवांसाठी वेगवेगळे अॅप्स आहेत, ज्यांना एका सुपर अॅपच्या मदतीने एकाच छत्राखाली आणावे लागेल. हे अगदी चीनच्या WeChat सारखे असणार आहे, जिथे युजर्सना एकाच मोबाइल अॅपमध्ये सर्व प्लॅटफॉर्मच्या सेवा मिळतात. या अॅपमध्ये पेमेंट सेवा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हिडिओ प्लॅटफॉर्म आणि चित्रपट तिकीट बुकिंग इत्यादी सेवांचा अनुभव घेऊ शकतात.