स्वाईप एलीट प्रो यात ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. १.४ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. तर मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ६.० मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे.
स्वाईप एलीट प्रो या स्मार्टफोनमध्ये यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अॅम्बिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. स्वाईप एलीट प्रो हे मॉडेल एंट्री लेव्हल या प्रकारातील आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना स्नॅपडील या शॉपींग पोर्टलवरून सादर करण्यात आला आहे.