मुंबई : जिओ, एअरटेल, व्होडाफोनसारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी एकीकडे टेरिफचे दर वाढविण्याचे निर्णय घेतला असताना सरकारी कंपनी बीएसएनएलमात्र महाराष्ट्रात सर्वाधिक ट्रेंड होऊ लागली आहे. बीएसएनएलने दर न वाढविण्याचा निर्णय घेतल्याने बीएसएनएलकडे पोर्ट करण्याची मोहिम सोशल मिडीयावर सुरू झाली आहे.
बीएसएनएलने 1699 रुपयांचा वर्षभराचा प्लॅन जाहीर केला होता. आता त्यामध्ये आणखी 60 दिवस बोनस मिळणार आहेत. यामुळे नेटकऱ्यांनी बीएसएनएलला हिट ठरवले आहे.
1699 रुपयांच्या रिचार्जवर 425 दिवसांसाठी तीन जीबी डेटा आणि मोफत कॉलिंग सेवा मिळणार आहे. यामुळे हा प्लॅन कसा फायद्याचा असेल यावर नेटकरी चर्चा करत आहेत. यामुळे #SwitchToBSNL आणि #BSNL_Plan1699 हे हॅशटॅग प्रचंड प्रमाणात ट्रेंड झाले आहेत.
आताच्या क्षणाला #SwitchToBSNL 43.4 हजार आणि #BSNL_Plan1699 या हॅशटॅगवर 44.2 हजार ट्विट करण्यात आले आहेत.