शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

फक्त 1899 रुपयांमध्ये TAGG Verve Neo स्मार्टवॉच भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स  

By सिद्धेश जाधव | Published: October 26, 2021 7:54 PM

Budget Smartwatch In India TAGG Verve Neo: TAGG Verve Neo स्मार्टवॉच कंपनीने 10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह सादर केला आहे. तसेच यात IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स देण्यात आला आहे.  

TAGG ने भारतात Verve Plus स्मार्टवॉच लाँच केल्याची बातमी कालच आम्ही दिली होती. आता या सीरिजमध्ये कंपनीने अजून एका डिवाइसची भर घातली आहे. कंपनीने Verve Neo नावाचा या सीरिजमधील चौथा स्मार्टवॉच बाजारात उतरवला आहे. TAGG Verve Neo मध्ये एक मोठा डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि फिटनेस ट्रॅकर फीचर्स देण्यात आले आहेत.  

TAGG Verve Neo Price 

TAGG Verve Neo ची किंमत 1,899 रुपये आहे. हा स्मार्टवॉच अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून विकत घेता येईल. या डिवाइसचे Rose Gold, Black आणि Blue असे कलर व्हेरिएंट उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कंपनीने 16 पेक्षा स्ट्रॅप देखील सादर केले आहेत.  

TAGG Verve Neo चे स्पेसिफिकेशन्स 

TAGG Verve Neo मध्ये 1.69-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा एक IPS LCD डिस्प्ले आहे, जो 500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या वॉचमध्ये 16 स्पोर्ट्स मोड आहेत. तसेच हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सीजन लेव्हल मोजणारा SpO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर आणि मेनुस्ट्रल सायकल ट्रॅकर असे हेल्थ फीचर्स देखील देण्यात आले आहेत.  

TAGG ने नव्या स्मार्टवॉचमध्ये नवीन इंटरफेस दिला आहे, ज्यात नोटिफिकेशन पॅनल आणि 100 पेक्षा जास्त वॉच फेसचा समावेश आहे. Verve Neo मध्ये GPS, म्यूजिक प्लेयर आणि कॅमेरा कंट्रोल असे फीचर्स मिळतात. यावर कनेक्टड स्मार्टफोनमधील कॉल, मेसेज आणि अ‍ॅप नोटिफिकेशन देखील मिळवता येतात.  

हा स्मार्टवॉच 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. TAGG Verve Neo मध्ये धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग देखील आहे. या स्मार्टवॉच सोबत तुम्हाला TAGG Neo अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. जे Apple App Store आणि Google Play Store वर उपलब्ध आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य