टाटा ग्रुपने आपल्या सुपर अॅपची घोषणा केली आहे. हे अॅप लवकरच भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकते. यामुळे भारतातील जियो, अॅमेझॉन, पेटीएम, फोनपे इत्यादी काही अॅप्सना चांगली टक्कर मिळू शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि सुपर अॅप म्हणजे काय? आणि याद्वारे कोणती सुपर कामे होतात? या अॅपचा सर्वसामान्य ग्राहकांना कोणता फायदा होईल? चला तर जाणून घेऊया सुपर अॅप विषयी सविस्तर माहिती.
सुपर अॅप म्हणजे काय?
अगदी सोप्प्या शब्दांत सांगायचे झाले तर सुपर अॅप म्हणजे अनेक सुविधा एकाच अॅपमध्ये देणाऱ्या अॅपला सुपर अॅप असे म्हणतात. तुम्ही अॅमेझॉन, पेटीएम, फोनपे असे अॅप्स वापरले असतील तर तुम्ही देखील सुपर अॅप वापरले आहेत. हे अॅप्स 10 ते 50 अॅप्सची कामे करतात त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनवरील स्टोरेज वाचते आणि एकाच ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध होतात.
हे देखील वाचा: भविष्याचा विचार करून आता स्वस्त 5G स्मार्टफोन्स विकत घ्यावे का?
भारतातील सुपर अॅप्सची यादी
साधारणतः अश्या कंपन्या सुपर अॅप बनवतात ज्या अनेक प्रकारच्या सेवा आणि उत्पादने विकतात. अश्या कंपन्या आपल्या अॅपची उपयुक्तता वाढवण्यासाठी थर्ड पार्टी सेवा देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करवून देतात. भारतात रिलायन्स इंडस्ट्रीज जियोच्या माध्यमातून शॉपिंग पासून क्लाऊड स्टोरेजपर्यंतच्या सुविधा देत आहे. पेटीएम, फोनपे आणि SBI YONO या अॅप्समध्ये देखील रिचार्ज, बिल पेमेंट पासून आयपीओ आणि इतर अनेक आर्थिक सुविधा दिल्या जात आहेत.
भारतातील आगामी सुपर अॅप्स
टाटा ग्रुपने गेल्याच वर्षी आपल्या सुपर अॅपची घोषणा केली आहे. या अॅपमध्ये ग्रुपचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आणि सर्विसेस उपलब्ध होतील. पुढल्या महिन्यात टाटा डिजिटल या कंपनी अंतर्गत या अॅपची टेस्टिंग सुरु होईल. यात फायनान्स, एंटरटेनमेंट, हेल्थ अँड वेलनेस, कस्टमर अँड रिटेल, एज्युकेशन, ट्रॅव्हल इत्यादी सेवांचा समावेश असू शकतो.
हे देखील वाचा: शोआमीचे फोन वापरणाऱ्यांना मिळणार 23 हजारांचे व्हाऊचर; 10 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीची घोषणा
देशातील सावर मोठी एफएमसीजी कंपनी ITC ने देखील अलीकडेच आपल्या सुपर अॅपची घोषणा केली आहे. या सुपर अॅपचे नाव ITC MAARS असेल MAARS म्हणजे मेटा मार्केट फॉर अॅडव्हान्स अॅग्रीकल्चर अँड रूरल सर्विसेस. हे अॅप शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह ITC च्या वर्ल्ड क्लास ब्रँड्सना ड्राइव करेल.