नवी दिल्ली : एकच प्लॅटफॉर्म टाटा प्ले बिंजवर (Tata Play Binge) जवळपास 26 हून अधिक ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर चित्रपट, टीव्ही शो, वेब सिरीज, लाइव्ह स्पोर्ट्स आणि इतर कंटेंट ऑफर करते. टाटा प्ले बिंज एका एग्रीगेटर प्लॅटफॉर्मप्रमाणे काम करते, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या OTT अॅप्समध्ये फक्त एक सबस्क्रिप्शन, एकदा पेमेंट आणि एका लॉगिनद्वारे अॅक्सेस करू शकता. टाटा प्ले बिंज अॅपसह, तुम्ही एकापेक्षा जास्त OTT प्रोव्हायडर्सकडून कंटेंट सहजपणे अॅक्सेस करू शकता.
बिंज मोबाइल अॅप सेवाबिंज मोबाइल अॅप टाटा प्ले डीटीएच ग्राहक आणि नॉन-सब्सक्रायबरसाठी एकसारखे आहे. टाटा प्ले डीटीएच सब्सक्रायबरसाठी बिंज मोबाइल अॅपमध्ये अॅक्सेस करण्याचे दोन मार्ग आहेत.पहिला म्हणजे नॉन-बिंज सब्सक्रायबर पेड सब्सक्रिप्शनच्या आधारावर ब्रिंज मोबाइल अॅपचा वापर करू शकतात. दुसरा म्हणजे सध्याच्या ब्रिंजचे सब्सक्रायबर टाटा प्ले ब्रिंज सेवेद्वारे ब्रिंज मोबाईल अॅप कोणत्याही सब्सक्रिप्शन किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय वापरू शकतात. नॉन-टाटा प्ले डीटीएचसाठी ब्रिंज मोबाइल अॅप देखील पेड सब्सक्रिप्शनच्या आधारावर उपलब्ध आहे. युजर्स फक्त Google Play Store किंवा App Store वरून अॅप डाउनलोड करू शकतात.
टाटा प्ले बिंज मेगा सब्सक्रिप्शनटाटा प्ले बिंज मेगा सबस्क्रिप्शन टीव्ही, मोबाइल आणि लॅपटॉपवरील 25 हून अधिक अॅप्समधून कंटेंट ऑफर करते. जे एकेकाळी चार डिव्हाइसवर पाहता येऊ शकते. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार, झी5, वूट सिलेक्ट, सोनी लिव्ह, एमएक्स प्लेयर, लायन्सगेट प्ले, इरॉस, हंगामा प्ले, शेमारुमी, एपिकॉन, डॉक्यूब, क्युरिऑसिटी स्ट्रीम, वूट किड्स, शॉर्ट्स टीव्ही, ट्रॅव्हल एक्सपी, सन एनएक्सटी, होइचोई, नम्मा फ्लिक्सचा समावेश आहे. दरम्यान, लक्षात ठेवा की तुमच्या पॅकमधील प्रत्येक OTT अॅपसाठी एकाचवेळी पाहण्यासाठी डिव्हाइस लिमिट वेगवेगळी होऊ शकते.