नवी दिल्ली: आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. DTH क्षेत्रातही Tata चा दबदबा कायम असल्याचे पाहायल मिळत आहे. या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या Tata Play कंपनीने आपल्या ग्राहकांना सरप्राइज देत सुखद धक्का दिला आहे. आता कंपनीने ग्राहकांना मोठे सरप्राइज दिले आहे. टाटा प्ले कंपनीने आपल्या चॅनेल पॅकच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.
काहीच दिवसांपूर्वी टाटाने आपल्या कंपनीच्या नावात बदल केला. टाटा स्काय या नावाने लोकप्रिय असलेल्या या कंपनीचे सुधारित नाव आता Tata Play करण्यात आले आहे. Tata Play ने आपल्या रिचार्ज पॅकला ग्राहकांसाठी अधिक स्वस्त केले आहे. कंपनीच्या रिचार्ज पॅकसाठी आधी ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत असे. परंतु, आता कंपनीने मोठी कपात केल्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्लान्समध्ये जवळपास १०० रुपयांपर्यंत कपात
Tata Play ने आपल्या मासिक चॅनेल पॅकच्या किंमतीत मोठी कपात असून, यामुळे ग्राहकांची ३० ते १०० रुपयांपर्यंत बचत होऊ शकते, असे सांगितले जात आहे. कंपनीनुसार यूजर्ससाठी रिचार्ज पॅकच्या किंमतीतील बदल यूजेस हिस्ट्रीच्या आधारावर केला जाईल. यूजर्सच्या पॅकमधून त्या चॅनेलला हटवले जाईल, ज्याचा यूजर्स कमी वापर करतात. अशाप्रकारे यूजर्सच्या मंथली रिचार्जला कमी केले जाईल. म्हणजेच, कंपनी यूजर्सकडून केवळ त्याच चॅनेलचे पैसे घेईल, ज्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. सध्या यूजर्स स्वतः पॅकच्या चॅनेलला हटवू शकत नाही.
दरम्यान, Tata Play भारतातील मोठी यूजर बेस कंपनी आहे. आताच्या घडीला टाटा प्लेचे जवळपास १९ मिलियन म्हणजेच १.९ कोटींपेक्षा अधिक अॅक्टिव्ह यूजर्स आहेत. इतर सर्विस प्रोव्हाइडर एव्हरेज रेवेन्यू पर यूजर्समध्ये वाढ करत असतानाच टाटा प्लेने रिचार्ज पॅकच्या किंमतीत कपात केली आहे. टाटा प्ले ने काही दिवसांपूर्वी आपल्या सर्विसमध्ये ओवर द टॉप (OTT) कंटेंटचा समावेश केला आहे. कंपनी आपल्या चॅनेल बुके आणि पॅकच्या किंमतीत कपात करत आहे. ज्यामुळे यूजर्सला ओटीटी कंटेंटचा आनंद घेता येईल. मात्र, या कपातीमुळे ग्राहकांचा फायदा होईल.