चिनी कंपनी TCL ने आज भारतात आपले तीन टॅब लाँच केले आहेत. कंपनीने पहिल्यांदाच भारतात टॅबलेट डिवाइस लाँच केले आहेत. यात TCL 10 Tab Max, TCL Tab 10 4G आणि TCL Tab 10s या डिव्हाइसेसचा समावेश करण्यात आला आहे. यातील TCL 10 Tab Max चे 4G आणि WiFi असे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत, तर TCL Tab 10s टॅबलेट फक्त WiFi व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आला आहे.
TCL 10 Tab Max 4G/ Wi-Fi चे स्पेसिफिकेशन्स
TCL 10 Tab Max 4G आणि Wi-Fi एडिशन टॅबलेट अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. यात 10.36-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑक्टकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा टॅब 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या टॅबमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या टॅबलेटमध्ये 8,000mAh बॅटरी 10W चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
TCL Tab 10 4G चे स्पेसिफिकेशन्स
TCL Tab 10 4G मध्ये 10.1-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 1920 × 1200 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा टॅब MediaTek MT8768E प्रोसेसरवर चालतो. कंपनीने यात 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिली आहे. या टीसीएल टॅबमध्ये 5 मेगापिक्सलचा रियर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा टॅब 5,500mAh बॅटरीसह येतो, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
TCL Tab 10s Wi-Fi स्पेसिफिकेशन्स
TCL Tab 10s मध्ये 10.1-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. हा टॅबलेट ऑक्टकोर MediaTek MT8768E प्रोसेसरवर चालतो. यात 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मिळते. या टॅबमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या टॅबलेटमध्ये 8,000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
TCL टॅबलेटची किंमत
- TCL 10 Tab Max 4G ची किंमत 20,999 रुपये
- TCL 10 Tab Max Wi-Fi ची किंमत 18,999 रुपये
- TCL Tab 10 4G ची किंमत 16,999 रुपये
- TCL Tab 10s Wi-Fi ची किंमत 15,999 रुपये
हे सर्व टीसीएल टॅबलेट मॉडेल भारतात Flipkart आणि निवडक रिटेलर्सच्या माध्यमातून 24 जुलैपासून विकत घेता येतील.