Tcl 20y launch with 48mp main camera 4000mah battery स्मार्टफोन निर्माता कंपनी टीसीएलने आपला नवीन बजेट स्मार्टफोन TCL 20Y सादर केला आहे. हा स्मार्टफोन सध्या कंपंनीने दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या बाजारपेठेत लाँच केला आहे. ब्लॅक आणि ब्लु कलर्समध्ये उपलब्ध होणारा हा स्मार्टफोन Unicsoc SC9863A प्रोसेसरवर चालतो. तसेच यातील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 4,000 एमएएचची बॅटरी देखील देण्यात आली आहे.
TCL 20Y चे स्पेसिफिकेशन्स
TCL 20Y स्मार्टफोनमध्ये यात 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक आयपीएस एलसीडी पॅनल आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Unicsoc SC9863A प्रोसेसर मिळतो. ज्याला 4GB RAM आणि 64GB स्टोरेजची जोड मिळते. ही स्टोरेज एक्सपांडेबल आहे आणि फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. हा बजेट स्मार्टफोन Android 11 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 4G VoLTE सह Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.0, यूएसबी-टाइप सी पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी रियर-माउंटिड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. TCL 20Y स्मार्टफोनमध्ये 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
TCL 20Y ची किंमत
TCL 20Y स्मार्टफोन फक्त एकच व्हेरिएंटमध्ये सादर झाला आहे. ज्यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. जागतिक बाजारात कंपनीने हा फोन 799 घानियन सेडी मध्ये लाँच केला आहे. ही किंमत सुमारे 9,664 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. वर सांगितल्याप्रमाणे हा फोन ब्लॅक आणि ब्लू अश्या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.