TCL ने भारतात नवीन 2021 C स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये C825, C728 आणि C725 असे तीन टीव्ही मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. यातील C825 हा भारतातील पहिला मिनी एलईडी 4K टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये एक मॅजिक कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या टीव्ही ब्रँड टीसीएलच्या नवीन टीव्ही सीरिजची माहिती. (TCL launches three new high-end 4K QLED Smart TVs in India)
TCL C825
TCL C825 भारतातील पहिला मिनी-एलईडी 4K टीव्ही आहे. चांगली पिक्चर क्वालिटी देण्यासाठी टीसीएल C825 मध्ये हजारो मिनी एलईडी देण्यात आले आहेत. या टीव्हीचा डिस्प्ले 1000 निट्स पीक ब्राइटनेस आणि एक अब्ज कलर्सना सपोर्ट करतो. या अँड्रॉइड 11 आधारित स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी विजन HDR देण्यात आला आहे. यातील 120 हर्ट्ज एमईएमसी सपोर्ट लो फ्रेम रेट असलेले व्हिडिओज देखील हाय फ्रेम रेटमध्ये दाखवू शकतो. यात HDMI 2.1 सह गेम मास्टर फिचर देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 1080P मॅग्नाटिक मॅजिक कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर आयमॅक्स एन्हान्सड सर्टिफाइड 2.1 इंटीग्रेटेड ONKYO साउंडबार, डॉल्बी अॅटमॉस असे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. TCL C825 चा 55-इंच मॉडेल 1,14,990 रुपये आणि 65-इंच मॉडेल 1,49,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
TCL C728
गेमर्सच्या गरजा लक्षात ठेऊन टीसीएलने QLED TV TCL C728 बनवली आहे. यात गेमर्ससाठी 120HZ MEMC आणि ऑटो लो लेटन्सी सपोर्ट देण्यात आला आहे. हा टीव्ही HDMI 2.1 ला सपोर्ट करतो. तसेच यात डॉल्बी विजन आयक्यूला सपोर्टसाठी क्वांटम डॉट टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. अँड्रॉइड 11 आधारित या टीव्हीमध्ये स्मार्ट-स्पिकर मोडसह एक ONKYO साउंड सिस्टम देण्यात आली आहे. C728 च्या 55-इंच व्हेरिएंटची किंमत 79,990 रुपये, 65-इंच व्हेरिएंटची किंमत 1,02,990 रुपये आणि 75-इंच व्हेरिएंटसाठी 1,59,990 रुपये मोजावे लागतील.
TCL C725
TCL C725 हा एक महागडा 4K QLED टीव्ही आहे. यात HDR 10+ आणि MEMC सपोर्ट देण्यात आला आहे. यात बिल्ट-इन Onkyo साउंडबार आणि Dolby Atmos चा सपोर्ट देखील मिळतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये एका व्हिडीओ कॉल कॅमेरा देण्यात आला आहे. C725 ची किंमत 50-इंच मॉडेल 64,990 रुपये, 55-इंच मॉडेल 72,990 रुपये आणि 65-इंच मॉडेल 99,999 रुपये आहे.