शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

महागड्या स्मार्टफोनसोबत मिळणाऱ्या स्टायलससह TCL चा स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 1:13 PM

TCL Stylus 5G स्मार्टफोनमध्ये Stylus, Android 12 आणि 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

TCL Stylus 5G स्मार्टफोन अमेरिकेत लाँच झाला आहे. याची खासियत म्हणजे या स्मार्टफोन सोबत सॅमसंगच्या Galaxy Note सारखं एक स्टायलस देण्यात आलं आहे. TCL Stylus 5G स्मार्टफोनची किंमत मात्र किफायतशीर ठेवण्यात आली आहे. TCL Stylus 5G स्मार्टफोन 260 डॉलर (सुमारे 20,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.  

TCL Stylus 5G स्पेसिफिकेशन्स 

TCL Stylus 5G स्मार्टफोनमध्ये 6.81-इंचाचा एचडी LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील स्टायलसचा वापर करण्यासाठी खास अ‍ॅप देण्यात आले आहे. यातील एक अ‍ॅप हस्तक्षर टेक्स्टमध्ये रूपांतरित करू शकतं. तर स्पेशल कॅल्क्युलेटर अ‍ॅप हातानं लिहीलीलेली समीकरणं ओळखतो. स्मार्टफोनमध्ये ऑडियो जॅक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो.  

TCL Stylus 5G स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP चा रियर कॅमेरा सेटअप मिळतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. टीसीएलच्या या स्मार्टफोनबद्दल कंपनीनं म्हटलं आहे की फक्त एक अँड्रॉइड अपडेट मिळेल. तर दोन वर्षापर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळतील. TCL Stylus 5G स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन