Tech Company Layoffs : ग्रॉसरी डिलिव्हरी अॅप डन्झोनं आपल्या 3 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलंल्याची माहिती दिली आहे. Dunzo ला Google चा पाठिंबा आहे. कंपनीचे सीईओ कबीर बिस्वास यांनी एका निवेदनात म्हटलं की, लोकांवर परिणाम करणारा कोणताही निर्णय कठीण आहे. गेल्या आठवड्यात, आम्हाला आमच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 3 टक्के कर्मचारी कमी करावे लागले.
डन्झोनं त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवर लिहिले की, त्यांच्याकडे 3000 कर्मचारी आहेत. याचाच अर्थ कंपनीनं जवळपास 90 जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. डंझोचे सीईओ म्हणाले की, या लोकांनी आमच्यासोबत त्यांचे करिअर घडवण्याचा निर्णय घेतला, पण अशा प्रतिभावान लोकांचे जाणे पाहून वाईट वाटते. या अचानक आलेल्या बदलाचा सामना करण्यासाठी कंपनी त्यांना सर्वतोपरी मदत करेल.
टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर धोक्याची घंटाटेक कर्मचाऱ्यांसाठी 2023 ची सुरुवात चांगली झाली नाही. Layoffs.fyi.com, लेऑफचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटनुसार, जानेवारीच्या पहिल्या 15 दिवसांत 91 टेक कंपन्यांमधील 24,151 लोकांनी नोकऱ्या गमावल्या. Amazon, Salesforce, Coinbase आणि इतर टेक-आधारित कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आघाडीवर होत्या. क्रिप्टो एक्सचेंज क्रिप्टो डॉट कॉमने असेही म्हटले की, ते आपल्या मानवी संसाधनांमध्ये 20 टक्के कपात करणार आहेत. भारतात, Ola आणि skit.ai ने वर्षाच्या पहिल्या महिन्यात टाळेबंदीची घोषणा केली होती.
2022 मध्ये लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्यावेबसाइटनुसार 2022 मध्ये 1,53,110 लोकांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. बहुतांश टेक कंपन्या टाळेबंदीमध्ये राहिल्या. मेटा, ट्विटर, ओरॅकल, स्नॅप, उबेर आणि इंटेल या प्रमुख टाळेबंदीचा समावेश आहे. केवळ नोव्हेंबरमध्येच 51489 लोकांची छाटणी करण्यात आली. या वर्षी गुगल आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. गुगल यावर्षी सुमारे 11000 कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते. प्रत्यक्षात असे घडल्यास 2023 हे तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी आतापर्यंतचे सर्वात वाईट वर्ष ठरू शकते.