नवी दिल्ली - सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा (Instagram) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. अनेक जण इन्स्टाग्रामवर आपल्या बेस्ट मोमेंट्स शेअर करत असतात. पण काही वेळा पोस्ट डिलीट होते. जर तुमचा फोटो किंवा इन्स्टाग्रामवर पोस्ट चुकून डिलीट झाली तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण डिलीट झालेली इन्स्टाग्राम पोस्ट रिकव्हर करता येऊ शकते. कसं ते जाणून घेऊया...
इन्स्टाग्राम पोस्ट अशी करा रिकव्हर
- डिलीट झालेल्या पोस्टला रिकव्हर करण्यासाठी सर्वप्रथम इन्स्टाग्राम App ओपन करा.
- आता आपल्या प्रोफाईल वर जा.
- या ठिकाणी उजव्या बादुच्या कॉर्नरवर तीन लाइनचा ऑप्शन दिसतील. त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला या ठिकाणी Recently deleted ऑप्शन दिसेल.
- जर हा ऑप्शन दिसत नसेल तर तुम्ही सर्च बॉक्समध्ये जाऊन हे सर्च करू शकता.
- या ठिकाणी ज्या पोस्ट डिलीट झालेल्या आहेत त्या तुम्हाला पोस्ट दिसतील.
- आता यातून ज्या पोस्ट हव्या आहेत त्या रिकव्हर करू शकता.
- यानंतर रिकव्हर करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
- तो ओटीपी एंटर करा.
- यानंतर तुमची डिलीट झालेली पोस्ट पुन्हा एकदा रिकव्हर होईल.
इन्स्टाग्रामवर डिलीट झालेली पोस्ट फक्त 30 दिवसांपर्यंत Recently deleted सेक्शनमध्ये उपलब्ध असते. युजर्सं फक्त 30 दिवसांच्या आत डिलीट झालेली पोस्ट रिकव्हर करू शकता. त्यानंतर ती पोस्ट कायमस्वरूपी डिलीट होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.