इंटरनेटच्या जगात अशा काही कंपन्या आहेत, ज्या सातत्यानं आपल्या गोष्टी ऐकत असतात. स्मार्टफोनबद्दल बोला किंवा मग अन्य स्मार्ट डिव्हाईसबाबत, आपण कळत-नकळत त्यांना त्याची परवानगी देतो. कॅमेऱ्यापासून माईकपर्यंत परवानगी देताना आपण त्याचा वापर केव्हा करण्यासाठी ती परवानगी देतोय हे पाहतच नाही.
गुगल व्हॉईस असिस्टंससाठी युझर्स मायक्रोफोनला परवानगी द्यावी लागते. याच्या माध्यमातून गुगल आपलं ऐकून काम करतं. याप्रकारे स्मार्टफोन्समध्ये व्हॉईस टू स्पीच फीचर युझ करण्यासाठीही मायक्रोफोनची परवानगी द्यावी लागलते. परंतु वापरल्यानंतर ही परवागनी काढून टाकता येते का? व्हॉईस कमांडवर काम करणाऱ्या ऑलवेज ऑन डिव्हाईसेससाठी समस्या असते. हे डिव्हाईस मायक्रोफोनचा वापर आपल्या गोष्टी ऐकण्यासाठी करतो. ज्याप्रकारे तुम्ही त्याचं नाव घेऊन कमांड दिल्यावर ॲलेक्सा काम करते.
फेसबुकही मागतं परवानगीअनेकदा फेसबुक आपल्या मायक्रोनचा ॲक्सेस मागतं. अशाच व्हिडीओ चॅट आणि टेक्स्ट टू स्पीचचासाठी मायक्रोफोनची परवानगी मागितली जाते. परंतु याद्वारे तुमच्या सर्व गोष्टी ऐकल्या जातात याचा तुम्ही परवानगी देण्यापूर्वी विचार करत नाही. पाहूया हे सेटिंग्स कशाप्रकारे रिमुव्ह करता येतील.
अँड्रॉईड युझर्ससाठीजर तुम्ही अँड्रॉईड युझर असाल तर फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर सिक्युरिटी आणि प्रायव्हसी ऑप्शनवर जावं लागले. प्रायव्हसीवर क्लिक करावं लागेल. तुम्हाला मायक्रोफोन, कॅमेरा आणि अन्य सेन्सर्सचीही माहिती मिळेल. तुम्ही कोणत्या ॲपला कोणती परवानगी दिली आहे हेदेखील जाणून घेऊ शकता. सोबतच मायक्रोफोन किंवा अन्य सेन्सरची परवानगी ॲपसाठी ब्लॉक किंवा रिमुव्ह करू शकता.
आयओएस युझर्सनं काय करावं?आयओएस युझर्सना कोणत्याही ॲपची परवानगी काढून टाकण्यासाठी सेटिंग्समध्ये जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला त्या ॲपवर क्लिक करावं लागेल, जे ॲप तुम्हाला रिमुव्ह करायचं आहे. त्या ॲपवर क्लिक केल्यानंतर मायक्रोफोनचं टॉगल ऑफ करावं लागेल. तुम्हाला हवं असल्यास सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी अँड सिक्युरिटीवरही जाऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला मायक्रोफोनचं लेबल मिळेल. तेथून ज्या ॲपची परवनागी काढायची आहे ती रिमूव्ह करू शकता.