टेक कंपनी Teclast ने आपल्या Teclast T40 सीरीजमध्ये तिसरा मॉडेल Teclast T40 Pro लाँच केला आहे. हा टॅबलेट 2K Display, UNISOC T618 प्रोसेसर, 8GB RAM, 7000mAh Battery आणि 18W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. सध्या हा टॅबलेट चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. अन्य देशांतील उपलब्धतेची माहिती मात्र अजून समोर आली नाही.
Teclast T40 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Teclast T40 Pro मध्ये 10.4 इंचाचा डिस्प्ले मिळेल, हा डिस्प्ले 2K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या टॅबमध्ये UNISOC T618 चिपसेटची प्रोसेसिंग प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. हा ड्युअल-सिम टॅबलेट अँड्रॉइड 11 वर चालतो.
या टॅबलेटमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, परंतु या सेन्सरची माहिती मात्र मिळाली नाही. यात बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी या टॅबमध्ये 7,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Teclast T40 Pro ची किंमत
Teclast T40 Pro चा एकमेव व्हेरिएंट चीनमध्ये सादर झाला आहे. हा JD.com वर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या डिवाइसचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,299 युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत 15,091 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.