शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

64MP कॅमेऱ्यासह स्वस्त Tecno Camon 17 सीरिज भारतात लाँच; इयरबड्स मिळणार मोफत 

By सिद्धेश जाधव | Published: July 15, 2021 4:41 PM

Tecno Camon 17 series price: Tecno Camon 17 आणि Tecno Camon 17 Pro हे दोन्ही स्मार्टफोन 26 जुलैच्या Amazon Prime Day Sale मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

गेल्या आठवड्यात Tecno Camon 17 सीरीज अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आली होती. आता ही सिरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. Tecno Camon 17 आणि 17 Tecno Camon 17 Pro हे दोन स्मार्टफोन कंपनीने भारतात सादर केले आहेत. हे दोन्ही फोन 26 जुलैपासून भारतात विकत घेता येतील. यातील CAMON 17 Pro मॉडेलच्या खरेदीवर TECNO Buds1 मोफत मिळतील.  (Tecno Camon 17 Pro, Tecno Camon 17 With 64-Megapixel Quad Cameras Launched in India)

Tecno Camon 17 आणि Tecno Camon 17 Pro ची किंमत  

Tecno Camon 17 स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे, हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. तर, Tecno Camon 17 Pro स्मार्टफोन 16,999 रुपयांमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह विकत घेता येईल.  

हे दोन्ही फोन्स 26 जुलैपासून सुरु होणाऱ्या Amazon Prime Day Sale मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील. टेक्नो कॅमॉन 17 प्रो स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 1,999 रुपयांचे TECNO Buds1 मोफत मिळतील. तसेच HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्डने हे फोन्स विकत घेतल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येईल.  

Tecno Camon 17 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Tecno Camon 17 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2460 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या टेक्नो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Helio G95 SoC देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आधारित HiOS कस्टम युआयवर चालतो. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी पावर बटनमध्ये एम्बेडेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.   

Tecno Camon 17 Pro मधील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 48 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या टेक्नो फोनमध्ये 33W फास्ट सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   

Tecno Camon 17 चे स्पेसिफिकेशन्स  

Tecno Camon 17 हा स्मार्टफोन 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या 90Hz आयपीएस एलसीडी डिस्प्लेवर लाॅन्च करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 सह आक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेटवर चालतो. या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.  

Tecno Camon 17 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 16 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडamazonअ‍ॅमेझॉन