Tecno ने नायजेरियामध्ये Tecno Camon 18 Premier हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीने भन्नाट कॅमेरा फीचर्ससह सादर केला आहे. कंपनीने 64-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच हा फोन 60x हायपर झूमच्या मदतीने चंद्राचा स्पष्ट फोटो काढू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. या फोनची किंमत मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे आणि कंपनीचा इतिहास पाहता काही आठवड्यांनी हा फोन भारतात देखील येऊ शकतो.
Tecno Camon 18 Premier स्पेसिफिकेशन्स
Tecno Camon 18 Premier स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 550 ब्राईटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेससिंगसाठी कंपनीने या डिवाइसमध्ये मीडियाटेक Helio G96 चा वापर केला आहे. टेक्नोचा हा फोन Android 11 वर आधारित Hi OS 8.0 वर चालतो.
Tecno Camon 18 Premier स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 256GB बिल्ट स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनमधील 4,750mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी यात 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth, GPS, NFC, USB-C, आणि 3.5mm जॅक असे ऑप्शन देण्यात आले आहेत.
Tecno Camon 18 Premier स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट खूप खास आहे. हा फोन 32-मेगापिक्सलच्या ड्युअल LED फ्लॅश असलेल्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सल गिम्बल स्टेबलाइज्ड कॅमेरा लेन्स आणि 8 मेगापिक्सल पेरिस्कोप झूम लेन्स देण्यात आली आहे. यातील पेरिस्कोप लेन्स 60X हायपर झूमला सपोर्ट करते जी गॅलिलियो अल्गोरिदम इंजिनचा वापर करून चंद्राचा स्पष्ट फोटो क्लिक करू शकते.