Tecno Camon 18i Price: Tecno ने गेल्या महिन्यात आपली ‘कॅमोन 18 सीरीज’ सादर केली होती. कंपनीने या सीरिजमध्ये Tecno Camon 18 Premier, Camon 18 आणि Camon 18P हे तीन फोन सादर केले होते. आता या सीरिजमध्ये भर टाकत कंपनीने Tecno Camon 18i स्मार्टफोन जागतिक बाजारात उतरवला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh Battery, MediaTek Helio G85 चिपसेट, 4GB RAM आणि 48 MP Camera असे शानदार स्पेक्स मिळतात.
Tecno Camon 18i चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Camon 18i मध्ये 6.6 इंचाचा 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या आयपीएस डिस्प्ले मिळतो . या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. सोबत माली जी52 जीपीयू देखील मिळतो. या फोनमध्ये 4जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा नवीन टेक्नो फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो.
फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळतो. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ड्युअल सिम 4G फोन Tecno Camon 18i मध्ये कनेक्टिविटी फीचर्स, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फोन फेस अनलॉक फीचर मिळते. तसेच पॉवर बॅकअपसाठी टेक्नो कॅमोन 18आय मधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Tecno Camon 18i ची किंमत
Tecno Camon 18i सध्या नायजेरियात सादर करण्यात आला आहे. तिथे या फोनची किंमत 84,500 नायजेरियन नायरा ठेवण्यात आली आहे. जी 14,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. कंपनीचा इतिहास पाहता लवकरच हा फोन भारतात देखील दाखल होऊ शकतो.