शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
2
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
6
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
7
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
8
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
9
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
10
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
12
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
13
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
14
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
16
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
17
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
18
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
19
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
20
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?

चकाचक सेल्फी! 32MP फ्रंट कॅमेऱ्यासह Tecno Camon 19 Neo लाँच, किंमत परवडणारी  

By सिद्धेश जाधव | Published: June 15, 2022 11:14 AM

Tecno Camon 19 Series अंतर्गत Camon 19 Neo स्मार्टफोन 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.  

Tecno Camon 19 Series चा पहिला स्मार्टफोन Camon 19 Neo नावानं लाँच करण्यात आला आहे. हा फोन 6GB RAM, 5000mAh बॅटरी, 32MP सेल्फी कॅमेरा आणि Android 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला आहे. सध्या हा बजेट 4G स्मार्टफोन बांग्लादेशात सादर करण्यात आला आहे. सीरिजमधील Camon 19 Pro 5G स्मार्टफोन देखील कंपनीनं टीज केला आहे.  

Camon 19 Neo चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. सोबत 6GB RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा फोन Android 12 वर आधारित HiOS UI वर चालतो. 

फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48MP चा मुख्य सेन्सर, 2MP चा मॅक्रो आणि एक AI सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. Tecno Camon 19 Neo मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.0, GPS, Wi-Fi सारखे फीचर्स मिळतात आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे. फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Camon 19 Neo ची किंमत किती?  

Camon 19 Neo च्या एकमेव 6GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,490 BDT (जवळपास 15,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. कंपनीचा इतिहास पाहता लवकरच हा हँडसेट सीमारेषा ओलांडून भारतात देखील दाखल होऊ शकतो. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल