Tecno Camon 19 सीरीजमधील एक एक स्मार्टफोन जागतिक बाजारात येऊ लागला आहे. कालच कंपनीनं Camon 19 Neo सादर केला होता. तर आता सीरिजमधील फ्लॅगशिप मॉडेल Tecno Camon 19 Pro लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB RAM, 120hz रिफ्रेश रेट आणी MediaTek प्रोसेसर तर मिळतोच परंतु फोनमधील सॅमसंगनं बनवलेला 64MP RGBW सेन्सर याची खासियत म्हणता येईल.
Tecno Camon 19 Pro Specifications
Tecno Camon 19 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील 64MP चा मुख्य कॅमेरा सॅमसंगनं बनवला आहे, जी इंडस्ट्रीमधील पहिली RGBW+G+P (red-green-blue-white color filter) लेन्स आहे, जिच्या मदतीनं तुम्ही Bright Night Portrait फोटोज काढू शकता. त्याचबरोबर 2X ऑप्टिकल झूम असलेला 50MP कॅमेरा सेन्सर आणि 2MP चा थर्ड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
Tecno Camon 19 Pro फोनमध्ये 6.8 इंचाचा full-HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच यात MediaTek Helio G96 प्रोसेसर मिळतो, सोबत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 5,000mAh च्या क्षमतेसह येते, जी 33W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येते.
Tecno Camon 19 Pro आणि Tecno Camon 19 Pro 5G ची किंमत
Tecno Camon 19 Pro च्या एकमेव 8GB RAM व 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 280 डॉलर्स (जवळपास 21,850 रुपये) ठेवण्यात आली आहे. फोनच्या 5G व्हेरिएंटची किंमत मात्र 320 डॉलर्स (जवळपास 25,000 रुपये) आहे. हा फोन सी सॉल्ट व्हाइट आणि इको ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येतो.