Tecno ने गेल्यावर्षी जूनमध्ये Phantom X नावाचा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला होता. आता हा फोन भारतीय ग्राहकांच्या भेटीला येणार असल्याची बातमी आली आहे. PassionateGeekz च्या रिपोर्टनुसार, Tecno Phantom X स्मार्टफोन एप्रिलमध्ये देशात सादर केला जाऊ शकतो. रिपोर्टमधून फोनच्या कलर आणि स्टोरेज व्हेरिएंटची माहिती दिली आहे.
Tecno Phantom X स्मार्टफोन भारतात 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. जागतिक बाजारात मात्र कंपनीनं 256GB स्टोरेज दिली होती. तसेच भारतात हा फोन स्टारी नाईट ब्लू आणि समर सनसेट कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोन भारतात 25,000 रुपयांच्या आसपास सादर केला जाऊ शकतो.
Tecno Phantom X चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Phantom X मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात गोरिल्ला ग्लास 5 चं प्रोटेक्शन दिलं आहे. हा एक कर्व डिस्प्ले आहे जो इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडरसह आला आहे.
अँड्रॉइड 11 आधारित HiOS वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये Helio G95 चिपसेट देण्यात आला आहे. Phantom X मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते.
Tecno Phantom X ची खासियत म्हणजे यातील ड्युअल सेल्फी कॅमेरा. या ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, सोबत 8 मेगापिक्सलची एक अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर वरच्या बेजलमध्ये एक LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सलची पोर्टेड लेन्स आणि क्वाड LED फ्लॅश देण्यात आला आहे.