स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने गेल्याच आठवड्यात Tecno Camon 17 स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये 12,999 रुपयांमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. टेक्नोने आज अजून एक स्वस्त स्मार्टफोन आणला आहे. कंपनीने Tecno Pop 4 LTE स्मार्टफोन भारतीय चालनानुसार 5,000 रुपयांच्या आसपास लाँच केला आहे. हा नवीन टेक्नो फोन सध्या फिलिपिन्समध्ये लाँच झाला आहे. या फोनच्या भारतीय लाँचची माहिती कंपनीने दिली नाही, परंतु Tecno Pop 4 LTE Smartphone भारतात लाँच झाला तर JioPhone Next ला चांगली टक्कर देऊ शकतो.
Tecno Pop 4 LTE Smartphone चे स्पेसिफिकेशन्स
टेक्नो पॉप 4 एलटीई स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक आयपीएस पॅनलवर आहे. हा टेक्नो स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएसवर चालतो. या फोनमध्ये क्वॉडकोर प्रोसेसरसह मीडियाटेक चिपसेट देण्यात आला आहे. फिलिपिन्समध्ये हा मोबाईल फोन 2 जीबी रॅमसह लाँच झाला आहे, ज्याला 32 जीबी इंटरनल स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Tecno Pop 4 LTE मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो, तसेच एक क्यूवीजीए एआय लेन्स देखील मिळते. हा टेक्नो फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Tecno Pop 4 LTE स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन फिलिपिन्समध्ये PHP 3,590 मध्ये लाँच करण्यात आला आहे, ही किंमत 5,300 रुपयांच्या आसपास आहे.