TECNO नं आपल्या ‘पॉप सीरीज’ मधील नवीन स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. कंपनीनं फक्त 8,499 रुपयांमध्ये TECNO POP 5 Pro सादर केला आहे. यातील 6000mAh ची बॅटरी या फोनची खासियत म्हणता येईल. गेल्याच आठवड्यात कंपनीनं TECNO POP 5 LTE देखील 6,299 रुपयांमध्ये लाँच केला होता. हे दोन्ही स्मार्टफोन्स बजेट सेगमेंटमध्ये देशातील अन्य कंपन्यांना तगडं आव्हान देऊ शकतात.
TECNO POP 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स
TECNO POP 5 Pro मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनसह बाजारात आला आहे. तसेच यात 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 269पीपीआई आणि 480निट्स ब्राईटनेस मिळते. पाण्याच्या शिंतोड्यापासून वाचण्यासाठी यात IPX2 सर्टिफिकेशन मिळते.
TECNO POP 5 Pro स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ‘गो एडिशन’ आधारित हायओएस 7.6 वर चालतो. या गो एडिशनमुळे स्मार्टफोनमध्ये कमी रॅम आणि स्टोरेज असली तरी फोन स्मूद चालतो. भारतात हा टेक्नो फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेकंडरी एआय लेन्स मिळते. फ्रंटला फ्लॅश लाईटसह 5 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. या ड्युअल सिम TECNO POP 5 Pro मध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. लागोपाठ गाणी ऐकल्यास हा स्मार्टफोन 5 दिवस चालेल, असा दावा कंपनीनं केला आहे.
हे देखील वाचा:
Flipkart Sale: 5 हजारांच्या आत Samsung चा Smart TV; पुन्हा मिळणार नाही ही सुवर्णसंधी