भारतीय बाजारात 7,000एमएएचची बॅटरी असलेला फक्त एकच स्मार्टफोन आहे, तो म्हणजे Samsung Galaxy M51. परंतु, आता Tecno ने भारतात Tecno Pova 2 स्मार्टफोनची घोषणा केली आहे, जो 7000mAh च्या बॅटरीसह बाजारात दाखल होईल. ट्रॅशन होल्डिंग इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवर एक टीजर शेयर केला आहे, या टीजरमध्ये 7000mAh बॅटरी असलेला एक नवीन स्मार्टफोन हँडसेट लाँच करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ट्विटमधील स्मार्टफोन टेक्नो पोवा 2 आहे, जो यापूर्वी फिलिपिन्समध्ये लाँच झाला असून लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. (Tecno Pova 2 India Launch Teased)
Tecno Pova 2 ची किंमत
जून मध्ये Tecno Mobile ने फिलिपिन्समध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Tecno Pova 2 लाँच केला gगेला होता. तिथे या मॉडेलची किंमत PHP 7,990 (सुमारे 11,900 रुपये) आहे, त्यामुळे भारत देखील हा स्मार्टफोन 10 ते 11 हजार रुपयांच्या आसपास सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे.
Tecno Pova 2 स्पेसिफिकेशन्स
Tecno Pova 2 मध्ये 6.9-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा टेक्नो स्मार्टफोन Android 11 वर आधारित HiOS 7.6 वर चालतो.
Tecno Pova 2 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा AI फोटोग्राफी सेन्सर देण्यात आला आहे. हा फ्रंटला 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. टेक्नो पोवा 2 मध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी 18W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.